LSG vs RCB, IPL 2023: भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी खेळाडू गौतम गंभीर हे दोघेही खेळाडू आहेत जे मैदानावरील त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत जेव्हा हे दोन खेळाडू मैदानावर आमनेसामने येतात तेव्हा शाब्दिक चकमक होणे साहजिकच असते. १० वर्षांपूर्वी विराट कोहली आरसीबीचा कर्णधार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा गंभीर असताना हे घडले होते आणि सोमवारी पुन्हा हे खेळाडू मैदानावर भिडले.

१० वर्षांपूर्वी गंभीर आणि कोहली यांच्यात भांडण झाले होते

२०१३ मध्ये आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना झाला होता. कोहलीचे यापूर्वी रजत भाटियासोबत मतभेद झाले होते. या सामन्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यात शाब्दिक चकमक आणि हाणामारी झाली होती. याच सामन्यात केकेआरचा पराभव झाला. दुसरीकडे, सोमवारी बंगळुरू संघाने लखनऊचा त्यांच्याच घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात १८ धावांनी पराभव केला.

हेही वाचा: GT vs DC Match: इशांत शर्माची भेदक गोलंदाजी! गुजरातवर पाच धावांनी रोमांचक विजय, दिल्लीचे प्ले ऑफ मधील आव्हान कायम

उथप्पाने कोहलीवर प्रश्न उपस्थित केले

सोमवारी, जेव्हा दोन खेळाडूंमध्ये आणखी एक भांडण झाले तेव्हा आरसीबीचे माजी खेळाडू अनिल कुंबळे आणि रॉबिन उथप्पा मैदानावरील दृश्य पाहून खूपच निराश झाले. सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असलेला रॉबिन उथप्पा म्हणाला, “हे योग्य नाही. एखाद्या गोलंदाजाने असे सेलिब्रेशन केले असते तर त्याला शिक्षा झाली असती. कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती.”

अनिल कुंबळेने गंभीर आणि कोहलीला धडा दिला

दुसरीकडे, अनिल कुंबळेला मैदानावर कोहली आणि गंभीरची कृती आवडली नाही. तो म्हणाला, “खेळाडूंना सामन्यादरम्यान खूप आक्रमक व्हावसं वाटतं पण त्यांना असं दाखवणं योग्य नाही. तुम्ही बोलू शकता पण जे घडले ते योग्य म्हणून स्वीकारता येणार नाही. ते काहीही असले तरी तुम्ही प्रतिस्पर्ध्याचा आदर केलाच पाहिजे. तुम्ही रागाच्या भरात काहीही बोलू शकता पण सामना संपला की हे वैर संपायला हवे असे हात झटकणे, अंगावर जाणे, शिवीगाळ करणे, आक्रमक होणे यावरून भारतीय क्रिकेटचा दर्जा खालावत आहे. त्यांच्यात नेमकं काय झाले ते माहित नाही पण जे काही होते ते वैयक्तिक वाटले. विराट आणि गंभीरने जे केले ते चांगले नव्हते, हे सर्व काही टाळता आले असते.”

हेही वाचा: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! कर्णधार के एल राहुल IPL मधून बाहेर, WTC फायनलमध्येही खेळणार नाही? कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्यात काय झालं?

लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीरही विराटशी भिडला. विराट नवीनसोबतच्या वादाला गौतमला समजावून सांगतोय असं वाटत होतं, पण इथून गंभीरचा संयम सुटला आणि विराटशी भांडण झालं. शेवटी लखनऊचे प्रशिक्षक विजय दहिया आणि कर्णधार के.एल. राहुल यांना या दोन खेळाडूंमध्ये मध्यस्थी करावी लागली.