IPL 2023, MI vs LSG Highlights Cricket Score Update: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १७२ धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला. लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार क्रुणाल पांड्याने ४९ धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊ संघाची सुरुवात खराब झाली. ५० धावांच्या आतच संघाचे पहिले तीन खेळाडू बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा सलामीवीर लवकर बाद झाले, त्यांना विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दीपक हुडा अवघ्या ५ धावा करून बाद झाला. यानंतर प्रेरक मांकडला भोपळाही फोडता आला नाही. क्विंटन डी कॉकने क्रुणाल पांड्यासोबत भागीदारी करत संघाची धावसंख्या ३०च्या पुढे नेली, पण त्यानंतर तोही इशान किशनच्या हाती झेलबाद झाला. संघाचा कर्णधार क्रुणाल पांड्या मोक्याच्या क्षणी दुखापतग्रस्त झाला आणि त्याने मैदान सोडले. क्रुणालने ४२ चेंडूत ४९ धावा केल्या. यानंतर मार्कस स्टॉयनिसने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. त्याने निकोलस पूरनला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी केली. स्टॉयनिसने वेगवान फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची सर्वोच्च नाबाद खेळी खेळली. पूरणनेही ८ चेंडूत ८ धावा करत त्याला साथ दिली. मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने सर्वाधिक २ गडी बाद केले त्याला पीयूष चावलाने १ गडी बाद करत मदत केली.

दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पण जो संघ जिंकेल तो प्लेऑफच्या जवळ जाईल. त्यामुळे या सामन्यात लखनऊ आणि मुंबईच्या कर्णधारांच्या नजरा विजयाकडे असतील. लखनऊने आतापर्यंत १२ सामने खेळले असून त्यात त्यांचे १३ गुण आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊला अजून खेळायचे आहे. त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर ती सहज प्ले ऑफमध्ये पोहोचेल. एक सामना जिंकून आणि एक सामना गमावूनही पुढे जाऊ शकतात, पण नेट रनरेट महत्त्वाचा असेल. दोन्ही लढतींमध्ये हरल्यास ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

Live Updates

Mumbai Indians vs Lukhnow Super Giants Highlights IPL 2023: मुंबई इंडियन्स वि लखनऊ सुपर जायंट्स हायलाइट्स अपडेट्स

23:35 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊचा मुंबईवर सनसनाटी विजय

लखनऊचा मुंबई इंडियन्सवर पाच धावांनी सनसनाटी विजय

मुंबई इंडियन्स १७२-५

23:28 (IST) 16 May 2023
MI vs LSG: सामना रोमांचक स्थितीत

मुंबई इंडियन्सला विजयासाठी ६ चेंडूत ११ धावांची गरज

मुंबई इंडियन्स १६७-५

23:20 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का, विष्णु विनोद बाद

एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सचे विकेट घेत लखनऊने सामना रोमांचक स्थितीत आणला. सध्या १३ चेंडूत ३३ धावांची गरज आहे.

मुंबई इंडियन्स १४५-५

https://twitter.com/IPL/status/1658529493089406982?s=20

23:12 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबईला चौथा धक्का, नेहल वढेरा बाद

मोहसीन खानने मुंबईला चौथा धक्का देत सामना रोमांचक केला आहे. नेहल वढेराने २० चेंडूत १६ धावा करत गौतमकरवी झेलबाद झाला. सध्या १८ चेंडूत ३९ धावांची मुंबईला गरज आहे.

मुंबई इंडियन्स १३९-४

https://twitter.com/IPL/status/1658527185513381888?s=20

22:57 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

लखनऊ मागील तीन ते चार षटकात सामन्यात परत आली आहे. रवी बिश्नोईने रोहित-इशानला बाद करत मोठा ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर यश ठाकूरने मागील सामन्यातील शतकवीर आणि घातक फलंदाज सूर्यकुमार यादव ९ चेंडूत ७ धावा करत त्रिफळाचीत झाला.

मुंबई इंडियन्स ११५-३

https://twitter.com/IPL/status/1658523683529576448?s=20

22:43 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबईला दुसरा धक्का, इशान किशन बाद

मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले असून लखनऊ सामन्यात परतली आहे. दोन्ही सेट फलंदाज रोहित आणि इशान हे एकापाठोपाठ बाद झाले. रवी बिश्नोईने त्याच्या दुसऱ्या षटकात इशान किशनला नवीन उल हक करवी झेलबाद केले. त्याने ३९ चेंडूत ५९ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स १०३-२

https://twitter.com/IPL/status/1658520549595971585?s=20

22:34 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. मुंबईसमोर आता १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. तब्बल ९० धावांची भागीदारी त्यांच्यात झाली. पण ती तोडण्यात लखनऊला यश आले. फिरकीपटू रवी बिश्नोईने दीपक हुड्डाकरवी रोहितला ३७ धावांवर बाद केले.

मुंबई इंडियन्स ९०-१

https://twitter.com/IPL/status/1658517850632642560?s=20

22:10 (IST) 16 May 2023
MI vs LSG: पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या ५० धावा पूर्ण

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. मुंबईसमोर आता १७८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली.

मुंबई इंडियन्स ५६-०

21:58 (IST) 16 May 2023
MI vs LSG: रोहितचा अफलातून षटकार

मुंबई इंडियन्सच्या डावातील तिसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्माने पुढे येत वेगवान गोलंदाज यश ठाकूरला शानदार पूल शॉट मारत स्टेडियममध्ये षटकार मारला.

मुंबई इंडियन्स ३४-०

https://twitter.com/IPL/status/1658508905239162886?s=20

21:49 (IST) 16 May 2023
MI vs LSG: १७८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचे फलंदाज मैदानात

१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजीची सुरू झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडी मैदानावर आली असून मुंबईने चांगली सुरुवात केली आहे.

मुंबई इंडियन्स २०-०

21:28 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊने मुंबई इंडियन्ससमोर ठेवले १७८ धावांचे आव्हान

आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. येथील विजेत्या संघाचे प्लेऑफमध्ये खेळणे जवळपास निश्चित होईल. त्याचबरोबर पराभूत संघाला अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. मुंबईसमोर आता १७८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स १७७-३

https://twitter.com/IPL/status/1658501212260700161?s=20

21:13 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मार्कस स्टॉयनिसचे दमदार अर्धशतक

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार क्रुणाल पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर परतला आहे. परतण्यापूर्वी ४२ चेंडूत ४९ धावा केल्या. मात्र, त्यानंतर अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने शानदार अर्धशतक झळकावले. ख्रिस जॉर्डनला एकाच षटकात २४ धावा कुटल्या. त्यात त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. लखनऊने खेळपट्टीचा विचार करता चांगली धावसंख्या केली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स १४८-३

https://twitter.com/IPL/status/1658498277296439296?s=20

21:03 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊला मोठा धक्का, कर्णधार पांड्या दुखापतग्रस्त

क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी शानदार भागीदारी करून संघाला सामन्यात पुनरागमन केले आहे. लखनऊच्या तीन विकेट ३५ धावांत पडल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले आहे. मात्र ४९ धावांवर असताना कर्णधार क्रुणाल पांड्याला मोठी दुखापत झाली असून त्याने मैदान सोडले आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या करण्यात आता संघाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स ११३-३

20:49 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊने १०० धावांचा टप्पा ओलांडला

लखनऊ सुपर जायंट्सच्या धावसंख्येने तीन विकेट्सवर १०० धावा ओलांडल्या आहेत. कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी शानदार भागीदारी करून संघाला सामन्यात पुनरागमन केले आहे. लखनऊच्या तीन विकेट ३५ धावांत पडल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स १०४-३

20:44 (IST) 16 May 2023
MI vs LSG: पीयूष चावलावर अंपायर भडकले

९व्या षटकात पियूष चावलाला अंपायरने समज दिली. चावला गोलंदाजी करताना खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये गेला आणि त्याला पहिली वॉर्निंग दिली गेली. त्याने पुन्हा ही चूक केल्यास त्याच्या गोलंदाजीवर सामन्यात बंदी घातली जाईल. त्यानंतर रोहित शर्मानेही त्याला समजावले. मात्र, मी कुठे डेंजर झोनमध्ये आलो हे पटवून देण्यासाठी त्याने अंपायरशी संवाद साधला, त्यावर अंपायर मात्र भडकले.

लखनऊ सुपर जायंट्स ९९-३

20:33 (IST) 16 May 2023
MI vs LSG: क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यात अर्धशतकी भागीदारी

पॉवर प्लेमध्ये लागोपाठ विकेट्स पडल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस लखनऊचा डाव सावरला आहे. त्या दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्यात ३६ चेंडूत ५३ धावांची भागीदारी झाली आहे. खेळपट्टी पाहता मुंबई इंडियन्सला लवकरात लवकर ही भागीदारी तोडण्याची आवश्यकता आहे.

लखनऊ सुपर जायंट्स ९०-३

https://twitter.com/IPL/status/1658488069702701057?s=20

20:21 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लागोपाठ विकेट्स पडल्यानंतर लखनऊने सावरला डाव

लागोपाठ विकेट्स पडल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी अप्रतिम फलंदाजी करत लखनऊचा डाव सावरला. पहिल्या १० षटकानंतर लखनऊने धावगती पकडली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स ६८-३

https://twitter.com/IPL/status/1658483686554337283?s=20

20:04 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊला तिसरा धक्का, क्विंटन डिकॉक बाद

मुंबई इंडियन्सचा मिस्ट्री स्पिनर पीयूष चावलाने त्याच्या पहिल्याच षटकात धोकादायक सलामीवीर क्विंटन डिकॉकला यष्टीरक्षक इशान किशनकरवी बाद केले. त्याने १५ चेंडूत १६ धावा केल्या. आता संघाची मदार कर्णधार क्रुणाल पांड्यावर आहे.

लखनऊ सुपर जायंट्स ३५-३

https://twitter.com/IPL/status/1658481004150165508?s=20

https://twitter.com/IPL/status/1658480014818676740?s=20

20:00 (IST) 16 May 2023
MI vs LSG: पॉवर प्ले मध्ये लखनऊची सावध सुरुवात, मोठ्या भागीदारीची गरज

१२ धावांवर लखनऊच्या दोन विकेट पडल्या. गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या प्रेरक मंकडला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. पहिल्याच चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने त्याला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. त्याआधी त्याने दीपक हुड्डाला बाद केले. मात्र, त्यानंतर डिकॉक आणि क्रुणाल पांड्या यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

लखनऊ सुपर जायंट्स ३५-२

19:50 (IST) 16 May 2023
MI vs LSG: एकाच षटकात लखनऊला दुसरा धक्का, प्रेरक मांकड बाद

लखनऊ सुपर जायंट्सची फलंदाजी सुरू झाली आहे. दीपक हुडा आणि प्रेरक मांकड यांनी मोठी खेळी करता आली नाही. मुंबईसाठी जेसन बेहरेनडॉर्फने एकाच षटकात दोन गडी बाद केले. प्रेरकला भोपळाही फोडता आला नाही.

लखनऊ सुपर जायंट्स १२-२

https://twitter.com/IPL/status/1658476846600814595?s=20

https://twitter.com/IPL/status/1658475478771175425?s=20

19:47 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊची खराब सुरुवात, दीपक हुड्डा बाद

लखनऊच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डा त्याचा खराब फॉर्म पुढे चालू ठेवत ७ चेंडूत ५ धावा करून टीम डेव्हिडकरवी झेलबाद झाला. त्याला जेसन बेहरेनडॉर्फने बाद केले.

लखनऊ सुपर जायंट्स १२-१

https://twitter.com/IPL/status/1658474994136121344?s=20

19:16 (IST) 16 May 2023
MI vs LSG: दोन्ही संघांची प्लेईंग ११

लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान.

राखीव खेळाडू: यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग, काइल मेयर्स.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

राखीव खेळाडू: विष्णू विनोद, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, राघव गोयल.

19:14 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबई-लखनऊ या दोन्ही संघात कोणाची वर्णी लागली?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ काही बदलांसह मैदानात उतरले आहेत. लखनऊ संघात तीन बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.

https://twitter.com/IPL/status/1658467819661692928?s=20

https://twitter.com/IPL/status/1658466839608041472?s=20

19:08 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

https://twitter.com/IPL/status/1658467294287388676?s=20

18:41 (IST) 16 May 2023
MI vs LSG: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११

लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), काइल मेयर्स, प्रेरक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या (कर्णधार), आयुष बदोनी, कृष्णप्पा गौतम, युधवीर चरक, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, आवेश खान. (इम्पॅक्ट खेळाडू: यश ठाकूर)

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, पीयूष चावला, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ (इम्पॅक्ट खेळाडू: आकाश मधवाल)

18:38 (IST) 16 May 2023
MI vs LSG: कसे असेल लखनऊचे हवामान?

लखनऊसह उत्तर भारत उष्णतेने ग्रासला आहे. मंगळवारी लखनऊचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. पावसाचीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळणार आहे. दवाचा फारसा परिमाण आजच्या सामन्यात होणार नाही.

18:36 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊची खेळपट्टी काय रंग दाखवणार आजच्या सामन्यात?

आयपीएल २०२३मधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीने चाहत्यांची खूप निराशा केली आहे. खेळपट्टीवर उसळी नसल्याने धावा काढणे कठीण होत आहे. येथील पहिला सामना वगळता कोणत्याही संघाला प्रथम फलंदाजी करताना १६० धावाही करता आल्या नाहीत. या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे अधिक कठीण आहे. गुजरातने १३५ तर आरसीबीने १२६ बचाव केला आहे. पुन्हा एकदा खेळपट्टी तशीच राहण्याची अपेक्षा आहे. जो कोणता संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करेल.

https://twitter.com/IPL/status/1658459876673359872?s=20

18:32 (IST) 16 May 2023
MI vs LSG: लखनऊला प्रेरक मांकडच्या रूपाने नवा स्टार मिळाला

लखनऊ संघाबद्दल बोलायचे झाले तर या संघासाठी सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे गेल्या मोसमात मुंबईवर विजय मिळवला तेव्हा संघाचा कर्णधार के.एल. राहुल होता. त्याने दोन्ही सामन्यात शतके झळकावली. या मोसमात तो नाही. अशा स्थितीत लखनऊला संघर्ष करावा लागू शकतो. तसेच, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लखनऊने प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांच्या काही आक्रमक खेळीमुळे १८३ धावांचे लक्ष्य सहज पार केले.

18:28 (IST) 16 May 2023
MI vs LSG: मुंबईजवळ मजबूत फलंदाजीची फळी

दुसरीकडे मुंबईबद्दल बोलायचे झाले तर संघाचा आत्मविश्वास सध्या शिखरावर आहे. सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर संघ सलग विजयाच्या मार्गावर आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचू शकेल, अशी समीकरणेही बनवली जातात, पण गुजरातला आपला पुढचा सामना गमवावा लागेल आणि मुंबई आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकेल, अशी स्थिती आहे. मुंबई संघाने गेल्या पाचपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. पाठलाग असो किंवा प्रथम फलंदाजी असो, दोन्ही बाबतीत संघ अप्रतिम कामगिरी करत आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1658423475860643840?s=20

18:19 (IST) 16 May 2023
MI vs LSG: सध्या दोन्ही संघ गुणतालिकेत कुठे आहेत?

मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १२-१२ सामने झाले आहेत. मुंबईने ७ सामने जिंकले आणि ५ गमावले. संघाचे १४ गुण आहेत. रोहित पलटण जिंकल्यास त्याचे १६ गुण होतील आणि संघ जवळजवळ प्लेऑफसाठी पात्र होईल. त्याचा शेवटचा सामना खराब फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध आहे. त्याचबरोबर लखनऊनेही आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यामध्ये संघाने सहा जिंकले तर पाच पराभव पत्करले. चेन्नईविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. लखनऊचा संघ जिंकल्यास त्याचे १५ गुण होतील. दोघांमध्ये आज अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1658436532854743042?s=20

Mumbai Indians vs Lukhnow Super Giants Highlights IPL 2023: मुंबई इंडियन्स वि लखनऊ सुपर जायंट्स हायलाइट्स अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग मधील ६३व्या सामन्यात एमआय पलटणवर लखनऊ सुपर जायंट्सने पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या पराभवामुळे मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग खडतर झाला आहे.