Virat Kohli vs Sourav Ganguly RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल २०२३चा २०वा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत होता. विराट कोहलीने चालू स्पर्धेत तिसरे अर्धशतक झळकावले आणि ऑरेंज कॅप यादीत सामील झाला. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वादाची सर्वाधिक चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज क्रिकेटपटू आणि दोन माजी कर्णधार, ज्यांना सर्वजण ओळखतात. मात्र या दोन दिग्गजांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद जगापासून कधीच लपून राहिलेला नाही. अलीकडेच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. त्या सामन्यात विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील जुन्या वादातील पुढचा अंक समोर आला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत आहेत, ज्यात विराट कोहली दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेल्या गांगुलीकडे पाहत आहे. ही घटना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १८व्या षटकात घडली, जेव्हा आरसीबीला विजयासाठी एक विकेट हवी होती. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये गांगुली कोहलीचा हात हलवून दुसऱ्या खेळाडूचे अभिनंदन करताना दिसत आहे.

वाद अजूनही मिटला नाही

विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात सर्व काही ठीक नाही, असे या घटनांवरून दिसते. आता विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील कृतीमुळे त्याला आणखी बळ मिळाले आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तर गांगुली कोहलीला फॉलो करत आहे.

हेही वाचा: Sehwag on Ponting: “कोच संघात काहीच करत नाही, झिरो…”; दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवावर सेहवाग रिकी पाँटिंगवर भडकला

नेमका वाद काय होता?

माहितीसाठी की, ऑक्टोबर २०२१ मध्ये कोहलीने भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. बीसीसीआयने आपल्याला या निर्णयाची माहिती दिली नसल्याचे सांगून विराट कोहलीने वादाला खतपाणी घातले. मात्र, गांगुलीने याच्या उलट विधान केले. हा वाद वाढत गेला आणि जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने दीर्घ स्वरूपाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 virat kohli unfollowed sourav ganguly on instagram avw
First published on: 17-04-2023 at 16:18 IST