IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: एम एस धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चेन्नईचा सामना म्हटलं की धोनी कधी एकदा फलंदाजीला येतोय याची चाहते वाट पाहत असतात, चेपॉकच्या मैदानात तर धोनीची वेगळीच क्रेझ आहे. सोमवारी झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यातही धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. चेन्नईला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना धोनीला फंलदाजीला येताना पाहून चाहत्यांनी मैदानात इतका आवाज केला की बाऊंड्री लाईनजवळ असलेल्या रसेलने आपले कान दोन्ही हातांनी झाकले.

केकेआरविरूद्ध चेन्नईचा सामना हा सीएसकेच्या घरच्या मैदानावर खेळवला जात होता. IPL 2024 च्या पहिल्या ४ सामन्यांमध्ये चेन्नईने चेपॉकवर दोन सामने खेळले होते. पण या दोन्ही सामन्यात धोनी फलंदाजीला उतरला नाही. त्यामुळे धोनीला पाहताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. चेन्नईला विजयासाठी ३ धावांची गरज असताना वैभव अरोराने शिवम दुबेला क्लीन बोल्ड केले. यानंतर धोनी फलंदाजीला आला.धोनीची फलंदाजी पाहण्याच्या आशेने सामना पाहायला आलेल्या लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. धोनीने मात्र ३ चेंडूंचा सामना करत एक धाव घेत नाबाद राहिला.

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

रसेलने धोनी मैदानात येताच कानावर हात का ठेवले?

महेंद्रसिंग धोनी जेव्हा क्रिजवर आला तेव्हा संपूर्ण चेपॉक स्टेडियम ‘धोनी धोनी’ या नावाने दुमदुमत होते. प्रेक्षकांच्या उत्साहाला पारावर उरला नव्हता. तो सतत जोरजोरात धोनीच्या नावाचा जयघोष करत होते. धोनी मैदानावर येत असतानाचा आवाजाने १२५ डेसिबलपर्यंतची सीमा गाठली होती. हा आवाज इतका होता की कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला कान झाकावे लागले. रसेल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता आणि आवाज इतका टिपेला पोहोचला होता की रसेलने कानावर हातच ठेवले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आंद्रे रसेलने सामन्यानंतर इन्स्टाग्रामला एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये धोनीसोबतचा त्याचा आणि धोनी-गंभीरचा सामन्यानंतरचा फोटो आहे. या फोटोला त्याने कॅप्शन देत म्हटले की, जगातला सर्वाधिक चाहते लाभलेला खेळाडू. धोनीची क्रेझही चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात आणि इतर संघांच्या घरच्या मैदानावरही तितकीच दिसून येते.

Andre Russell Instagram Story after CSK vs KKR Match

चेन्नईचा तिसरा विजय

चेन्नई सुपर किंग्जचा या मोसमातील हा ५वा सामना होता. संघाने तिसरा विजय मिळवला आहे. सीएसकेने या मोसमातील तिन्ही विजय त्यांच्या घरच्या मैदानावरच मिळवले. दोन सामन्यांमध्ये चेन्नईला दिल्ली आणि हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. चेपॉक हा नेहमीच चेन्नईचा गड राहिला आहे आणि इथे त्यांना हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही.