CSK vs RCB Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा ६ विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने ८ चेंडू राखून आणि ६ गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला. चेन्नईकडून रचिन रवींद्रने ३७, अजिंक्य रहाणेने २७ धावा, शिवम दुबेने नाबाद ३४ आणि रवींद्र जडेजाने नाबाद २५ धावा केल्या. तत्पूर्वी, गोलंदाजीत चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमानने चार विकेट्स घेतल्या.

Live Updates

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा ६ विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली.

00:09 (IST) 23 Mar 2024
CSK vs RCB: चेन्नईची विजयी सलामी; मुस्तफिझूर रहमान विजयाचा शिल्पकार

आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ६ विकेट्सनी पराभव केला. सीएसकेने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने आठ चेंडू बाकी असताना ६ गडी राखून सामना जिंकला. मुस्तफिझूर रहमान हा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजांना वेसण घातले.

कर्णधार ऋतुराजने चांगली सुरुवात करुन केली

आरसीबीने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी झाली जी यश दयालने मोडली. या सामन्यात कर्णधार १५ धावा करू शकला. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रहाणे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. २७ धावा करू खेळणाऱ्या रहाणेच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेलने दोन षटकारांच्या मदतीने २२ धावा काढल्या.

जडेजा आणि दुबे यांच्यात मॅच विनिंग पार्टनरशिप –

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाने चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६६ धावांची नाबाद भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या दुबेने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. त्याचवेळी या स्टार अष्टपैलूने १७ चेंडूत २५ धावा केल्या. या सामन्यात दोन्ही फलंदाज नाबाद राहिले. आरसीबीतर्फे कॅमेरून ग्रीनने २ तर यश दयाल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

00:06 (IST) 23 Mar 2024
चेन्नईच्या पहिल्याच सामन्यात शानदार विजय

१९ व्या षटकातील शिवम दुबेच्या धारदार फलंदाजीच्या जोरावर पहिल्याच सामन्यात आरसीबीवर ६ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. मुस्तफिजूर रहमानची गोलंदाजी सामन्यात महत्त्वाची ठरली.

23:40 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सीएसकेला विजयासाठी २४ चेंडूत ३४ धावांची गरज

चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या चार बाद १४० धावांवर पोहोचली आहे. आता सीएसकेला विजयासाठी २४ चेंडूत फक्त ३४ धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा १३ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १९ धावा तर शिवम दुबे १६ चेंडूत १५ धावांवर खेळत आहे.

23:35 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सीएसकेला विजयासाठी ३० चेंडूत ४६ धावांची गरज

चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या चार विकेट्सवर १२८ धावांवर पोहोचली आहे. आता सीएसकेला विजयासाठी ३० चेंडूत फक्त ४६ धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा १० चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १६ धावा तर शिवम दुबे १३ चेंडूत ७ धावांवर खेळत आहे.

23:21 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सीएसकेला चौथा धक्का, २२ धावा करून डॅरिल मिशेल बाद

१३ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावा आहे. डॅरिल मिशेल १८ चेंडूत २२ धावा करुन बाद झाला. शिवम दुबे ८ चेंडूत ६ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर रवीद्र जडेजा २ धावांवर नाबाद आहे.

23:08 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चेन्नई एक्सप्रेसला तिसरा धक्का! अजिंक्य रहाणे २७ धावा काढून बाद

चेन्नईने ११व्या षटकात ९९ धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. अजिंक्य रहाणे १९ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने २७ धावा करून बाद झाला. कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर तो सीमारेषेवर झेलबाद झाला. चेन्नईला विजयासाठी अद्याप ५८ चेंडूत ७५ धावा करायच्या आहेत.

23:03 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : डॅरिल मिशेलने कर्ण शर्माच्या एका षटकात ठोकले सलग दोन षटकार

डॅरिल मिशेलने कर्ण शर्मावर दोन षटकार ठोकले. नवव्या षटकात एकूण १५ धावा आल्या. आता चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या दोन गडी बाद ८८ अशी झाली आहे. मिचेल १४ आणि रहाणे १९ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये १२ चेंडूत १७ धावांची भागीदारी झाली आहे.

22:54 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चेन्नईची दुसरी विकेट पडली, रचिन रवींद्र बाद

चेन्नईची दुसरी विकेट सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ७१ धावांवर पडली. रचिन रवींद्र १५ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. करण शर्माने रवींद्रला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेन्नईला अजूनही विजयासाठी ७८ चेंडूत १०३ धावा करायच्या आहेत.

22:50 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर चेन्नईची धावसंख्या १ बाद ६१

चेन्नईचे फलंदाज वेगवान फलंदाजी करताना दिसत आहेत. संघाने ६ षटकांत १बाद ६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान रचिन रवींद्रने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या आहेत, तर अजिंक्य रहाणेने ८ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या आहेत.

22:41 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का! कर्णधार ऋतुराज गायकवाड १५ धावांवर बाद

चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपाने बसला. त्याने १५ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश दयालने चेन्नईच्या कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता अजिंक्य रहाणे क्रीझवर आला आहे. ५ षटकांनंतर, सीएसकेची धावसंख्या ४९/१ धावा आहे.

22:36 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चेन्नईच्या डावाला वेगवान सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज वेगाने पुढे जात आहे. तीन षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या २८/० आहे. कर्णधार गायकवाडने १३ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा तर रचिन रवींद्रने ६ चेंडूत १७ धावांपर्यंत मजल मारली.

22:34 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : दिनेश कार्तिकच्या जागी यश दयाल मैदानात दाखल

आरसीबीने डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल यांची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड केली आहे. दिनेश कार्तिकच्या जागी यश दयाल मैदानात आला आहे . अनुज रावत विकेट कीपिंग करत आहे. दोन षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या बिनबाद १३ धावा आहे.

22:24 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सीएसकेच्या डावाला सुरूवात, नव्या कर्णधाराचा पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार

चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू झाली आहे. डावातील पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड चौकार ठोकत दमदार सुरुवात करुन दिली. त्याने पहिल्या षटकात रचिन रवींद्रसह सलामी देताना एका षटकानंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एकही न गमावता ८ धावा आहे. गायकवाडने मोहम्मद सिराजच्या षटकातील सर्व चेंडू खेळले.

21:53 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : रावत-कार्तिकच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने उभारला धावांचा डोंगर, सीएसकेला दिले १७४ धावांचे लक्ष्य

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने अवघ्या ७८ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी झंझावाती खेळी करत सामन्याची दिशा बदलली. रावतने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. कार्तिक २६ चेंडूत ३८ धावा करून परतला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. या दोघांच्या खेळीमुळे आरसीबीने चेन्नईला १७४ धावांचे लक्ष्य दिले. तत्पूर्वी विराट कोहली २१, फाफ डू प्लेसिस ३५, ग्लेन मॅक्सवेल ०, कॅमेरून ग्रीन १८ आणि रजत पाटीदार शून्यावर बाद झाले होते. तर चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमानने चार विकेट घेतल्या. त्याने दोन वेळा एका ओव्हरमध्ये दोन बळी घेतले.

21:53 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : रावत-कार्तिकच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने उभारला धावांचा डोंगर, सीएसकेला दिले १७४ धावांचे लक्ष्य

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने अवघ्या ७८ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी झंझावाती खेळी करत सामन्याची दिशा बदलली. रावतने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. कार्तिक २६ चेंडूत ३८ धावा करून परतला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. या दोघांच्या खेळीमुळे आरसीबीने चेन्नईला १७४ धावांचे लक्ष्य दिले. तत्पूर्वी विराट कोहली २१, फाफ डू प्लेसिस ३५, ग्लेन मॅक्सवेल ०, कॅमेरून ग्रीन १८ आणि रजत पाटीदार शून्यावर बाद झाले होते. तर चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमानने चार विकेट घेतल्या. त्याने दोन वेळा एका ओव्हरमध्ये दोन बळी घेतले.

21:33 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : अनुज रावतने तुषार देशपांडेच्या षटकात धावांचा पाडला पाऊस

१८ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या पाच विकेटवर १४८ धावा आहे. अनुज रावत २२ चेंडूत ४१ धावांवर खेळत आहे. तर दिनेश कार्तिक १७ चेंडूत २७ धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला आहे. दोघांमध्ये ३८ चेंडूत ७० धावांची भागीदारी आहे. तुषार देशपांडेने आपल्या या षटकांत एकूण २५ धावा दिल्या.

21:26 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : आरसीबीने पलटवार करत दोन षटकांत २६ धावा केल्या

आरसीबीने छोटेसे पुनरागमन केले आहे. शेवटच्या दोन षटकात एकूण २६ धावा केल्या आहेत. १६ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात ११६ धावा आहे. अनुज रावत १३ चेंडूत २० तर दिनेश कार्तिक १४ चेंडूत १८ धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये २६ चेंडूत ३८ धावांची भागीदारी झाली आहे.

21:22 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चहरच्या षटकात १२ धावा आल्या, आरसीबीने ओलांडला १०० धावांचा टप्पा

आरसीबीची धावसंख्या १०० पार पोहोचली आहे. दीपक चहरच्या षटकात एकूण १२ धावा आल्या. १५ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या पाच बाद १०२ धावा आहे. अनुज रावत ११ चेंडूत १८ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत दिनेश कार्तिक १० चेंडूत ६ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये २४ धावांची भागीदारी झाली आहे.

21:10 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : १३ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या ५ बाद ८३ धावा

१३ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या ५ विकेटवर ८३ धावा आहे. मुस्तफिझूर रहमानने अवघ्या दोन षटकांत चार विकेट घेतल्या आहेत. सध्या दिनेश कार्तिक आणि अनुज रावत क्रीजवर आहेत. दोघेही प्रत्येकी तीन धावांवर खेळत आहेत.

21:03 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : मुस्तफिझूरने आरसीबीचे मोडले कंबरडे, एकाच षटकात ग्रीन-विराटला दाखवला तंबूचा रस्ता

मुस्तफिझूर रहमानने पुन्हा एकदा आरसीबीला एकाच षटकात दोन धक्के दिले. त्याने प्रथम विराट कोहलीला बाद केले आणि नंतर कॅमेरून ग्रीनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आरसीबीने ७८ धावांत ५ विकेट गमावल्या आहेत.

20:54 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : रवींद्र जडेजाने एका षटकात दिली फक्त एक धाव

रवींद्र जडेजाने ११व्या षटकात केवळ एक धाव दिली. ११ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ७६ धावा आहे. चेन्नईच्या फिरकीपटूंनी आरसीबीच्या वेगाला ब्रेक लावला आहे. कोहली आणि ग्रीनमध्ये सहाव्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी झाली.

20:50 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : कोहली-ग्रीनने सावरला आरसीबीचा डाव

९ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या तीन विकेट गमावून ६३ धावा आहे. विराट कोहली १२ चेंडूत ११ धावांवर तर कॅमरून ग्रीन १५ चेंडूत १४ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये २१ चेंडूत २१ धावांची भागीदारी झाली आहे.

20:43 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चेपॉकमध्ये कोहलीच्या नावावर ‘विराट’ रेकॉर्ड, टी-20 मध्ये ६ धावा करून रचला इतिहास

विराट कोहलीने २ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आणि पहिल्याच सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात कोहलीने ६ धावा करत टी-२० चा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आजपर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नाही. वास्तविक, कोहली टी-२० फॉरमॅटमध्ये १२००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.

20:37 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : बंगळुरूने दोन धावांत तीन विकेट गमावल्या, रजत-मॅक्सवेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले

शानदार सुरुवातीनंतर आरसीबीचा डाव गडगडला आहे. सात षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या तीन बाद ४८ धावा. एकेकाळी या संघाची धावसंख्या तीन षटकात एकही विकेट न गमावता ३३ धावा होती. आता विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन क्रीजवर आहेत.

20:33 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : आरसीबीची तिसरी विकेट पडली

आरसीबीने ४२ धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर बाद केले. याआधी फाफ डू प्लेसिस ३५ आणि रजत पाटीदार शून्यावर बाद झाले.

20:30 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : मुस्तफिजुर रहमानने एकाच घेतले षटकात दोन बळी

मुस्तफिजुर रहमानने चेन्नई सुपर किंग्जमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने एकाच षटकात बेंगळुरूला दोन धक्के दिले. मुस्तफिजुर रहमानने प्रथम फाफ डू प्लेसिसला बाद केले आणि नंतर रजत पाटीदारला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. प्लेसिस 35 तर पाटीदार शून्यावर बाद झाले. 5 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा आहे.

20:22 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : फाफ डु प्लेसिसने सीएसकेच्या गोलंदाजाचा घेतला समाचार

आरसीबीने चांगली सुरुवात केली आहे. फाफ डु प्लेसिस सहज चौकार मारतोय. दीपक चहरच्या षटकात प्लेसिसने चार चौकार मारले. ३ षटकांनंतर, बंगळुरूची धावसंख्या बिनबाद ३३ धावा आहे. फाफ डू प्लेसिसने १७ चेंडूत सात चौकार मारले आहेत.

20:19 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : तुषार देशपांडेच्या षटकात प्लेसिसने मारले दोन चौकार

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तुषार देशपांडेच्या षटकात प्लेसिसने दोन चौकार मारले. या षटकात एकूण ९ धावा आल्या. २ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या एकही विकेट न गमावता १६ धावा आहे. विराट १ आणि प्लेसिस १४ धावांवर खेळत आहे.

20:09 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीकडून आरसीबीच्या डावाला सुरुवात

आयपीएल २०२४ च्या हंगामाला सुरूवात झाली आहे. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली आरसीबीसाठी सलामीला आले आहेत. तर चेन्नईने पहिले षटक दीपक चहरकडे सोपवले. एका षटकानंतर आरसीबीची धावसंख्या एकही विकेट न पडता सात धावा आहे.

19:56 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश टेकशाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीचा ६ विकेट्सने पराभव केला. चेन्नईने १७४ धावांचे लक्ष्य ८ चेंडू राखून पूर्ण केले.