IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात IPL 2024 चा पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातील अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात चाहत्यांमध्ये हाणामारी होत असल्याचे दिसत आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स विरूध्द गुजरात टायटन्सच्या सामन्यात वातावरण तापले होते. कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून सामना सुरू होण्यापूर्वी रोहितच्या चाहत्यांनी हार्दिक पंड्याला चांगलंच ट्रोल केलं. रविवारी सामना सुरू असताना रोहित आणि हार्दिकच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. या सामन्यादरम्यानचा एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते एकमेकांशी भिडले असून जोरदार हाणामारी सुरू आहे. हा व्हिडिओ झपाट्याने पसरला, मात्र चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचे कारण समोर आलेले नाही.

यंदाच्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला नारेबाजी, पोस्टरबाजी करत ट्रोल केले. इंग्लिश समालोचक केविन पीटरसनही म्हणाला की, भारतातील क्रिकेटपटूला अशाप्रकारे ट्रोल करण्याची पहिलीच घटना मी पाहिली आहे. हार्दिक पंड्याबद्दल चाहते निराश होण्याचे मोठे कारण म्हणजे रोहित संघात असतानाही मुंबई इंडियन्सचा कर्णधार त्याला बनवण्यात आले. ज्यामुळे चाहते खूपच नाराज झाले.

मुंबई इंडियन्सने हंगामापूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या कर्णधार असेल असे जाहीर केले होते. या निर्णय रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अजिबातच पटलेला नाही. यामुळेच हार्दिक पांड्या टीकेच्या भोवऱ्यात सापडला आणि चांगली कामगिरी करण्यातही तो अयशस्वी टरला. मुंबई इंडियन्स संघाला १६९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात अपयश आले.

सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. साई सुदर्शनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी खेळली. तसेच जसप्रीत बुमराहला ३ विकेट्स मिळवल्या. प्रत्युत्तरात, चांगली सुरुवात करूनही, मुंबई संघ कोलमडला आणि निर्धारित षटकांत ९ गडी गमावून केवळ १६२ धावाच करू शकला. मुंबईकडून रोहित शर्माने ४३, डेवाल्ड ब्रेविसने ४६, नमन धीरने २० आणि तिलक वर्माने २५ धावा केल्या. रोहित, ब्रेविस वगळता इतर फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत.