कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सामना मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अग्रस्थानी पोहोचण्याचे कोलकाताचे लक्ष्य असणार आहे.

राजस्थान संघाला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास सुनील नरेनचे आव्हान असेल. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने २०१२ व २०१४ मध्ये जेतेपद मिळवले होते व त्या संघात नरेनचा सहभाग होता. ईडन गार्डन्सवर नरेनने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे. गंभीर संघासोबत आल्यानंतर नरेन पुन्हा एकदा चांगल्या लयीत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात संघ जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक बनला आहे. कोलकाताचा संघ पाच सामन्यांत आठ गुणांसह दुसऱ्या, तर राजस्थानचा संघ सहा सामन्यांत दहा गुणांसह अग्रस्थानी आहे.

Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

सॉल्ट, रसेलकडे लक्ष

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने आठ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात फिल सॉल्टने आक्रमक अर्धशतक झळकावले होते. नरेनने मात्र चांगली गोलंदाजी करताना लखनऊला ७ बाद १६१ धावसंख्येवर रोखले. नरेनने या सत्रात चांगली फलंदाजीही केली आहे. ‘आयपीएल’ इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या मिचेल स्टार्कने लखनऊविरुद्ध तीन गडी बाद करत चमक दाखवली होती. कर्णधार श्रेयस अय्यरने गेल्या सामन्यात नाबाद ३८ धावा केल्या असल्या, तरीही त्याला गोलंदाजांचा सामना करताना अडचणी येत आहेत. सध्याच्या हंगामात सॉल्ट, नरेन व अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी संघासाठी योगदान दिले आहे. संघातील भारतीय फलंदाजांना अजून छाप पाडता आलेली नाही. रिंकू सिंहला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत आणि त्याला चार डावांत ६३ धावाच करता आल्या. नितीश राणाही दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही.

हेही वाचा >>> क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान

सॅमसन, बोल्टवर मदार

राजस्थान रॉयल्स संघाच्या फलंदाजांनी संघासाठी या हंगामात चमक दाखवली आहे. कर्णधार संजू सॅमसन, रियान पराग व शिम्रॉन हेटमायर यांनी राजस्थानसाठी धावा केल्या आहेत. मात्र, कोलकाताविरुद्ध नरेनच्या गोलंदाजीचा सामना ते कसे करतात हे पाहणे उत्सुकतेचे असेल. जोस बटलर या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल का, हे अजून स्पष्ट नाही. तो पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. परागकडून या सामन्यात मोठया खेळीची अपेक्षा असेल. सलामीवीर यशस्वी जैस्वालला अजूनही लय सापडलेली नाही. त्यामुळे या लढतीत त्याच्यावर लक्ष असेल. संघाकडे ट्रेंट बोल्ट, आवेश खान, यजुवेंद्र चहल आणि केशव महाराजसारखे गोलंदाज असल्याने त्यांचे आक्रमक भक्कम दिसत आहे. त्यामुळे कोलकाताच्या अडचणी वाढू शकतात.

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.