CSK vs RCB Live Streaming, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगचा १७ वा सीझन म्हणजेच आयपीएल २०२४ उद्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. यंदा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळणार आहे. या सेरेमनीला अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. पण सीएसके आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना लाइव्ह कुठे पाहायला मिळणार आहे, जाणून घ्या. - quiz चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना कुठे खेळवला जाणार? एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई CSK vs RCB यांच्यातील पहिला सामना किती वाजता सुरू होणार सामना ८ वाजता सुरू होईल तर सामन्याची नाणेफेक ७.३० वाजता होईल. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरूध्द बंगळुरू यांच्यातील पहिला सामना कुठल्या ओटीटी अॅपवर पाहायला मिळेल जिओ सिनेमा चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना भारतात कोणत्या स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल? स्टार स्पोर्ट्स १ (इंग्रजी), स्टार स्पोर्ट्स १ (हिंदी), स्टार स्पोर्ट्स १ (कन्नड), स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, प्रवाह पिक्चर मराठी हेही वाचा: IPL च्या यशामुळे जगभरात सुरू झालेल्या ट्वेंटी-२० लीग तुम्हाला माहित आहेत का? भारतात आयपीएल २०२४ चे सामने जिओ सिनेमा अॅप आणि वरील नमूद केलेल्या स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाइव्ह पाहायला मिळणार आहेत. तर जगभरात कोणकोणत्या चॅनेलवर आयपीएलचे सामने लाइव्ह पाहता येणार आहेत, इथे जाणून घ्या.यूएसए - क्रिकबझ ॲप, विलो टीव्हीकॅनडा - क्रिकबझ ॲप, विलो टीव्हीयुनायटेड किंगडम - DAZN, स्काय स्पोर्ट्सऑस्ट्रेलिया - फॉक्स स्पोर्ट्सन्यूझीलंड - स्काय स्पोर्ट एनझेडदक्षिण आफ्रिका - सुपरस्पोर्टपाकिस्तान - युप टीव्हीकॅरिबियन - फ्लो स्पोर्ट्सबांगलादेश - गाझी टीव्हीअफगाणिस्तान - एरियाना टेलिव्हिजन नेटवर्कनेपाळ - स्टार स्पोर्ट्स, युप टीव्हीश्रीलंका - स्टार स्पोर्ट्स, युप्प टीव्हीमालदीव - स्टार स्पोर्ट्स, युप्प टीव्हीसिंगापूर - स्टारहबगयाना - इ-नेट भारतासह ३७ देशांमध्ये आयपीएलचं थेट प्रक्षेपण होणार आहे. वरील नमुद केलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये क्रिकबझ ॲपवर पाहायला मिळणार आहेत.