जयपूर : मुंबई इंडियन्सचा सामना सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

गेल्या चार सामन्यांत मुंबईच्या संघाने तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. हंगामाच्या खराब सुरुवातीनंतर गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी पोहोचले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सचा संघ चांगल्या लयीत असून १२ गुणांसह ते शीर्षस्थानी आहेत. राजस्थानविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास मुंबईला सर्वच विभागांत कामगिरी उंचवावी लागेल.

Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 36 runs
RR vs SRH : सामना हरताना पाहून राजस्थान रॉयल्सची चाहती भावूक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल
Ipl 2024 rajasthan royals vs kolkata knight riders 70th match prediction
IPL 2024 : राजस्थान विजयपथावर परतण्यास उत्सुक; गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या कोलकाताशी आज सामना
Rajasthan Lift Collapse
राजस्थानच्या कोलिहानमध्ये मोठी दुर्घटना; लिफ्टची साखळी तुटल्याने खाणीत अडकलेल्या १४ जणांना वाचवण्यात यश
rajasthan royals vs punjab kings match predictions
IPL 2024: रियानच्या कामगिरीकडे लक्ष ; राजस्थानसमोर आज पंजाब किंग्जचे आव्हान
Gujarat Titans must win the IPL cricket match against Kolkata Knight Riders sport news
गुजरातला विजय अनिवार्य! आज कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान; रसेल, गिलकडे लक्ष
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
mahayuti third phase challenge marathi news
तिसऱ्या टप्प्यातील मतदानात सातही जागा कायम राखण्याचे महायुतीपुढे आव्हान
Ipl 2024 lucknow super giants vs kolkata knight riders 54th match prediction
IPL 2024 : विजयी लय राखण्याचा कोलकाताचा प्रयत्न; आज लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ; राहुल, नरेनकडून अपेक्षा

हेही वाचा >>> PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन

बुमरावर गोलंदाजीची मदार

पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईने गेल्या सामन्यात आशुतोष शर्माने झळकावलेल्या अर्धशतकानंतरही पंजाब किंग्जविरुद्ध नऊ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराने तीन गडी बाद केले. सध्या बुमरा १३ बळींसह ‘आयपीएल’मध्ये अधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. मात्र, बुमराला इतर गोलंदाजांकडून म्हणावी तशी साथ मिळालेली नाही. गेराल्ड कोएट्झीने १२ फलंदाजांना माघारी धाडले आहे. पण, त्याने खूप धावा दिल्या आहेत. आकाश मढवाल व कर्णधार हार्दिक पंडयालाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. फलंदाजांमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत आहे. मात्र, तरीही संघ पराभूत झाला. इशान व हार्दिक यांना चमक दाखवण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादव लयीत असणे ही मुंबईच्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू आहे.

बटलर, बोल्टकडे लक्ष

राजस्थानने मुंबईविरुद्धच्या गेल्या सामन्यात चमक दाखवली होती. ट्रेंट बोल्टने त्यांच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. यजुवेंद्र चहलने १२ गडी बाद करत संघासाठी चमक दाखवली आहे. मात्र, रविचंद्रन अश्विन अडचणीत दिसत आहे. फलंदाजी रियान परागने आतापर्यंत ३१८ धावा केल्या आहे. कर्णधार संजू सॅमसननेही २७६ धावा करत आपले योगदान दिले आहे. जोस बटलरने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आपल्या खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र, सलामीवीरात यशस्वी जैस्वालची लय संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुंबईविरुद्ध तो कामगिरी करण्यास उत्सुक असेल. शिम्रॉन हेटमायरही आक्रमक खेळ करत आहे.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.