रणजी ट्रॉफीचा मालिकावीर ठरलेला मुंबई संघाचा फिरकी गोलंदाजी अष्टपैलू तनुष कोटियन राजस्थान रॉयल्समध्ये संघात सामील झाला आहे. ॲडम झम्पाच्या जागी बदली खेळाडू म्हणून तो संघात असणार आहे. तर गुजरात टायटन्सने IPL 2024पूर्वी अपघातात जखमी झालेल्या रॉबिन मिंझच्या जागी कर्नाटकचा यष्टिरक्षक-फलंदाज बीआर शरथला सामील केले आहे. तनुष कोटियन आणि शरथ या दोघांनाही २० लाखांच्या मूळ किमतीसह संघात सामील केले आहे.

– quiz

Shubman Gill Will Play His 100th Ipl Match In Dc vs Gt Match
DC vs GT : शुबमन गिलने केला खास पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा सर्वात तरुण खेळाडू
Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष

डिसेंबरमध्ये लिलावापूर्वी झाम्पाला रॉयल्सने संघात कायम ठेवले होते परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. IPL 2024 पूर्वी त्याचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते कारण तो गेल्या वर्षी भारतात वनडे विश्वचषक संपल्यानंतर बिग बॅश लीग तसेच भारत, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी राष्ट्रीय संघाचा भाग होता.

हेही वाचा: Mumbai Ranji Title 2024: मुंबईतल्या मैदानात घाम गाळून तयार झाले रणजी विजेते शिलेदार

आयपीएल लिलावापूर्वी बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे बाहेर झालेला तनुष कोटीयन राजस्थानच्या संघात

तनुष कोटीयन हा २०२३ च्या आयपीएल लिलावात सर्वच आयपीएल फ्रँचायझींच्या रडारवर होता. पण त्यानंतर त्याच्या संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे बीसीसीआयच्या यादीत त्याचे नाव सापडल्यानंतर कोणीही त्याच्यावर बोली लावण्याची जोखीम पत्करली नाही. हल्लीच रणजी ट्रॉफीचा राजा ठरलेल्या मुंबई संघातील तो महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करत संपूर्ण मोसमात ५०२ धावा केल्या. मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत त्याने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत शतकही केले.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कोटियनने आठ सामन्यांत ५.५८ च्या इकॉनॉमीने नऊ विकेट्स घेतल्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्धच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने षटकार मारून मुंबईला विजेतेपद मिळवून दिले, तर गोलंदाजीत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आता त्याला राजस्थानच्या संघात सामील केले आहे. रॉयल् संघ स त्यांच्या रोस्टरमध्ये फक्त सात परदेशी खेळाडूंसह IPL 2024 मध्ये प्रवेश करत आहे.

गुजरात टायटन्सने झारखंडचा अनकॅप्ड विकेटकीपर-फलंदाज मिन्झला ३.६ कोटींमध्ये खरेदी केले होते. परंतु या महिन्याच्या सुरुवातीला बाईक अपघातामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला. शरथने खालच्या-फळीत फलंदाजीसह दोन प्रभावी खेळी खेळल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याचा जास्त स्ट्राइक रेट १८५ इतका होता.