चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सीएसकेच्या विजयात एक मोठी भूमिका बजावली. चेपॉकवर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाला चेन्नईच्या गोलंदाजांनी अवघ्या १३७ धावांवर रोखले, यामध्ये जडेजाने चार षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. जडेजाच्या ३ विकेट्सने संघाच्या विजयाचा पाया रचला आणि सीएसकेने घरच्या मैदानावर केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. जडेजाला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार तर मिळाला पण सोबतच सीएसकेने त्याला एक स्पेशल नवं नावही दिलं आहे.

– quiz

विजयानंतर, जडेजाला सीएसकेने कोणते स्पेशल नाव त्याला दिले आहे याबाबत विचारण्यात आले. जसे की एमएस धोनीला ‘थाला’ आणि सुरेश रैनाला ‘चिन्ना थाला’ म्हणतात. यावर जडेजाने सांगितले की, माझी बिरुदावली अजून पक्की झालेली नाही, पण मला आशा आहे की एखादं स्पेशल नाव मलाही मिळेल.

चेन्नई सुपर किंग्सने यानंतर काही वेळातच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले- ???????? ?? ??????? ??????????

चेन्नईने जडेजाला क्रिकेट थालापती असे नाव दिले आहे. थालापती या शब्दाचा अर्थ कमांडर किंवा नेता असा आहे. जडेजाने कायमच सीएसकेसाठी शानदार कामगिरी केली आहे. जडेजा २०१२ मध्ये चेन्नई संघाशी जोडला गेला आणि तेव्हापासून आतापर्यंत जडेजा सीएसकेचा एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर जडेजा म्हणाला, “या मैदानावर मी माझ्या गोलंदाजीचा नेहमीच आनंद घेतो. जर तुम्ही चेंडू योग्य ठिकाणी टाकला तर तुम्हाला मदत मिळते. पाहुण्या संघाला या मैदानावर येऊन नियोजन करण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला क्वचितच २-३ दिवस मिळतात. पाहुण्या संघाला या मैदानावर येऊन खेळपट्टी कशी खेळेल हे समजून घेत खेळणे थोडे कठीण जाते.”