Rajasthan Royals vs Mumbai Indians Highlights, IPL 2024: सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळी आणि संदीप शर्माच्या पाच विकेट्ससह राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानने प्लेऑफच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. या विजयासह रॉयल्सचे आठ सामन्यांतील सात विजयांसह १४ गुण झाले असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर मोठी आघाडी घेतली आहे. आठ सामन्यांत तीन विजय मिळवून मुंबईचे अवघे सहा गुण झाले असून संघ सातव्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईच्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जैस्वाल (नाबाद १०४) जोस बटलर ३५) यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. यानंतर त्याने कर्णधार संजू सॅमसन (२८चेंडूत नाबाद ३८, दोन षटकार, दोन चौकार) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची मोठी भागीदारी केली. यासह रॉयल्सने आठ चेंडू शिल्लक असताना एका विकेटवर १८३ धावा करून विजय मिळवला. जैस्वालने ६० चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि सात षटकार मारले.

मुंबई इंडियन्सने खराब सुरुवात करत टॉप-३ फलंदाजांना स्वस्तात गमावले. यानंतर तिलक वर्माचे अर्धशतक (४५ चेंडूत तीन षटकार आणि पाच चौकारांसह ६५ धावा) आणि नेहालसह (४९ धावा) पाचव्या विकेटसाठी केलेल्या ९९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर नऊ विकेट्सवर १७९ धावा केल्या. वढेराने २४ चेंडूंचा सामना करत चार षटकार आणि तीन चौकार लगावले.

राजस्थानकडून संदीप शर्माने ५ विकेट्स करत उत्कृष्ट गोलंदाजी केली. ट्रेंट बोल्टने २ विकेट तर चहल आणि आवेशने एक-एक विकेट मिळवली.

Live Updates
23:52 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: राजस्थानचा मुंबईवर सहज विजय

यशस्वी जैस्वालच्या नाबाद १०४ धावांसह राजस्थानने मुंबईवर ९ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय साकारला. यशस्वीने शानदार शतक झळकावत राजस्थानला सहज विजय मिळवून दिला. तत्त्पूर्वी राजस्थानच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी करत मुंबईच्या धावांवर अंकुश ठेवला. ज्यामध्ये संदीप शर्माने ५ विकेट्स घेतल्या.

23:45 (IST) 22 Apr 2024
यशस्वीचे दणदणीत शतक

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने मुंबईविरूद्धच्या सामन्यात आपले शानदार शतक झळकावले आहे. यशस्वीने ५९ चेंडूत आपले आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. यशस्वीचे पहिले शतकही मुंबईविरूद्धच झाले होते.

23:31 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: १५ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या

१५ षटकांनंतर राजस्थानने १ बाद १५१ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल शतक करण्याच्या मार्गावर आहे. तर संजू सॅमसन त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ देत आहे.

23:02 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: यशस्वी जैस्वालचे आयपीएल २०२४ मधील पहिले अर्धशतक

यशस्वी जैस्वालने यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरत होता. पण मुंबईविरूद्धच्या सामन्यात यशस्वीने ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

22:54 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: बटलर क्लीन बोल्ड

अनुभवी पियुष चावलाने मुंबई इंडियन्ससाठी पहिली मोठी विकेट मिळवून दिली आहे. पावसानंतर दुसरे षटक टाकणाऱ्या चावलाने संपूर्ण षटकात त्रास देत शेवटी अखेरच्या चेंडूवर पियुषने बटलरला क्लीन बोल्ड केले.

22:46 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: सामन्याला पुन्हा सुरूवात

राजस्थानमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून सामन्याला पुन्हा सुरूवात झाली आहे. मुंबईकडून मोहम्मद नबी गोलंदाजीला आला आहे.

22:31 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: कितीला सुरू होणार सामना

राजस्थानमध्ये पाऊस थांबला असून १०.३३ मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरूवात होईल, अशी माहिती सुरूवातीला देण्यात आली होती. पण सामना सुरू होण्यासाठी अजून थोड्या वेळाचा कालावधी लागणार आहे. पावसाच्या सरींना पुन्हा सुरूवात झाली आहे.

22:09 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: पाऊस सुरू

मुंबई-राजस्थानच्या सामन्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पॉवरप्लेनंतर राजस्थानची धावसंख्या ६१ धावा आहे. सध्याच्या घडीला डीएलएसनुसार धावसंख्या ४१ आहे, त्यामुळे राजस्थानचा संघ सामन्यात पुढे आहे.

22:02 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: पॉवरप्लेनंतर राजस्थानची धावसंख्या

पॉवरप्लेमध्ये राजस्थानने बिनबाद ६१ धावा केल्या आहेत. राजस्थानचे दोन्ही सलामीवीर मैदानात कायम असून मुंबईला पहिल्या विकेटची प्रतिक्षा आहे. यशस्वी ३१ धावा तर बटलर २८ धावांवर खेळत आहे.

21:56 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: कोएत्झीची जैस्वालकडून धुलाई

कोएत्झीच्या चौथ्या षटकात जैस्वालने १६ धावा केल्या. पहिल्या चेंडूवर षटकार तर नंतर २ चौकार लगावत धावा चोरल्या. कोएत्झीने १४९ च्या वेगाने चांगली गोलंदाजी केली, जैस्वालही बाद होता होता वाचला.

21:50 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: नुवान तुषाराची चांगली गोलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा नुवान तुषाराने आपल्या पहिल्याच आयपीएल षटकात फलंदाजांना त्रास देत अवघ्या सहा धावा दिल्या. नुवानच्या गोलंदाजीवर फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. बटलर-यशस्वीने प्रत्येक चेंडूवर एकेक धाव घेतली. ३ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या १९ धावा आहे.

21:39 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: राजस्थानची शानदार सुरूवात

राजस्थानच्या फलंदाजीला सुरूवात झाली आहे. मुंबईकडून हार्दिकने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्या षटकात बटलरने २ चौकार लगावत एक चांगली सुरूवात संघाला दिली आहे. पहिल्या षटकात राजस्थानने ११ धावा केल्या.

21:19 (IST) 22 Apr 2024
मुंबईने दिले १८० धावांचे लक्ष्य

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १७९ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा आणि नेहल वधेराने ९९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोन युवा फलंदाजांमुळे मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे.

21:16 (IST) 22 Apr 2024
RR vs MI- संदीप शर्माने मुंबईला दिले दोन धक्के

मुंबई इंडियन्सने संदीप शर्माच्या षटकात सलग दोन विकेट्स गमावले. पहिल्याच चेंडूवर तिलक वर्मा ६५ धावा करत झेलबाद झाला. दुसऱ्या चेंडूवर कोएत्झी गोल्डन डकवर बाद झाला. तर पाचव्या चेंडूवर ३ धावा करत चीम डेव्हिड झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १७९ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा आणि नेहल वधेराने १०० धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोन युवा फलंदाजांमुळे मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. या दोघांशिवाय मोहम्मद नबीने पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकांमध्ये संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. २३ धावांच्या खेळीत नबीने १ षटकार, २ चौकार लगावले. त्यानंतर नेहल आणि तिलक वर्माने सर्वांनाच आपल्या खेळीने प्रभावित केले. तिलकने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी ४५ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. तर १ धावेने अर्थशतक हुकलेल्या नेहलने २४ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या.

या तिन्ही फलंदाजांशिवाय एकही फलंदाजाने १०च्यावर धावसंख्या उभारली नाही. संघाचे टॉप ३ फलंदाज स्वस्तात बाद झाले. रोहित ६, इशान ० तर सूर्या १० धावा करत बाद झाला. तर अखेरच्या षटकात मुंबईने ३ विकेट्स गमावल्याने मुंबई अवघ्या ३ धावाच करू शकली. राजस्थानकडून संदीप शर्मा शानदार गोलंदाजी करत १८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर बोल्टने २ विकेट आणि आवेश, चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विकेटसह चहलने आयपीएलमध्ये आपले २०० विकेट्स पूर्ण केले आहेत.

21:09 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: हार्दिक पंड्या झेलबाद

१९व्या षटकातील आवेशच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्या पायचीत झाला. १० चेंडूत १० धावा करत तो बाद झाला.

20:55 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: अवघ्या एका धावेसाठी हुकले नेहलचे अर्धशतक

तिलक वर्माला चांगली साथ दिलेला नेहल वधेरा ४९ धावांवर झेलबाद झाला. चहलला सलग दोन षटकार लगावल्यानंतर पुढच्या बोल्टच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नेहल वधेरा मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. नेहलने २४ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदकीने ४९ धावा केल्या.

20:52 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: तिलक वर्माचे शानदार अर्धशतक

तिलक वर्माने मोक्याच्या क्षणी मैदानात टिकून राहत शानदार अर्धशतक झळकावले. तिलकने चहलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत ५५ धावा पूर्ण केल्या. तिलकने ४० चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. तर नेहल वधेरा त्याला चांगली साथ देत मैदानात आहे.

20:45 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: ४ षटकांत ४८ धावा

मुंबईच्या युवा फलंदाजांनी संघाचा डाव सावरला असून १४ षटकांत या दोघांनी मिळून ४८ धावा केल्या आहेत. मुंबईच्या युवा फलंदाजांनी संघाचा डाव सावरला असून १४ षटकांत या दोघांनी मिळून ४८ धावा केल्या आहेत. अकराव्या षटकात १० धावा, १२व्या षटकात १३ धावा, १३ व्या षटकात ६ आणि १४ व्या षटकात १९ धावा केल्या. तिलक ४३ धावा आणि नेहल वधेरा ३१ धावांवर खेळत आहे.

20:24 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: १० षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

मुंबईची धावसंख्या १० षटकांनंतर ४ बाद ७२ अशी आहे. तिलक वर्मा आणि नेहल वढेराची जोडी मैदानात आहे.

20:16 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: चहलने मुंबईला दिला चौथा धक्का

मोहम्मद नबीला झेलबाद करत चहलने आपल्या २०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. २३ धावा करत नबी बाद झाल्याने मुंबईला चौथा धक्का बसला आहे.

20:03 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: मोहम्मद नबीची शानदार फटकेबाजी

आवेश खानच्या एका षटकात मोहम्मद नबीने १८ धावा केल्या. पहिल्या चेंडूवर नबीने २ धावा केल्या, तर पुढील तीन चेंडूवर एक षटकार आणि दोन चौकार लगावले. नबीच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने प्लेऑफमध्ये ३ बाद ४५ धावा केल्या.

20:01 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: नबी-तिलकची जोडी मैदानात

लागोपाठ तीन मोठ्या धक्क्यानंतर मोहम्मद नबी तिलक वर्माची जोडी मैदानात आहे. ५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ३ बाद २७ धावांवर खेळत आहे.

19:51 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: सूर्यकुमार यादवही झेलबाद

चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने सूर्यकुमार यादवालही स्वस्तात बाद केले. सूर्या बाद होण्यापूर्वी ८ चेंडूत २ चौकारांसह १० धावा करत बाद झाला. मुंबईची धावसंख्या सध्या ३ बाद २० धावा इतकी आहे.

19:43 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: रोहितनंतर इशान किशन झेलबाद

रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर पुढील षटकात इशान किशनही बाद झाला. रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर पुढील षटकात इशान किशनही बाद झाला. राजस्थानकडून दुसरे षटक टाकण्यासाठी संदीप शर्मा आला. संदीपच्या तिसऱ्या चेंडूवर इशान किशनच्या बॅटची कड घेत चेंडू सॅमसनच्या हातात गेला. दोघांनीही विकेटसाठी अपील केले. पण मैदानावरील पंचांनी प्रतिक्रिया न दिल्याने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी इशानला बाद घोषित केले. खातेही न उघडता इशान ३ चेंडू खेळत बाद झाला.

19:35 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: बोल्टने रोहितला केलं झेलबाद

रोहित शर्माच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. रोहित शर्माच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. रोहितने बोल्टच्या पहिल्या चेंडूवर २ धावा केल्या. तर दुसऱ्याच चेंडूवर रोहितने शानदार चौकार लगावला. नंतरचे दोन चेंडू डॉट केले. पण पाचव्या चेंडूवर रोहितने लगावलेला फटक्याने चेंडू सरळ रेषेत हवेत गेला आणि संजू सॅमसनकडून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने ५ चेंडूत एका चौकारासह ६ धावा केल्या.

19:32 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: मुंबईच्या डावाला सुरूवात

मुंबई विरूद्ध राजस्थानच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानात आहे. तर ट्रेंट बोल्टकडून गोलंदाजीला सुरूवात. रोहितने बोल्टच्या चेंडूवर शानदार चौकार मारत सामन्याला सुरूवात केली.

19:16 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: मुंबई इंडियन्ससाठी १०० वा सामना

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याचा हा मुंबई इंडियन्ससाठी १०० वा आयपीएल सामना आहे. ज्या फ्रँचायझीमधून मी आयपीएलच्या प्रवासाला सुरूवात केली त्या संघासाठी १००वा आयपीएल सामना खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असं नाणेफेकीदरम्यान हार्दिक म्हणाला.

19:12 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन):

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह</p>

19:12 (IST) 22 Apr 2024
RR vs MI: राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

19:10 (IST) 22 Apr 2024
MI vs RR: राजस्थानसाठी आनंदाची बातमी

राजस्थानचा महत्त्वाचा गोलंदाज संदीप शर्मा दुखापतीनंतर पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे. कुलदीप सेनच्या जागी संदीप शर्माला संधी देण्यात आली.

Rajasthan Royals vs Mumbai Indians Highlights, IPL 2024: राजस्थानच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वीच्या शतकी कामगिरीच्या जोरावर राजस्थानने मुंबईवर ९ विकेट्सने विजय मिळवला आहे.