IPL 2024, Chennai Super Kings vs Gujarat Titans: रवींद्र जडेजाला सीएसके वि गुजरातच्या सामन्यात चेपॉकच्या मैदानावर चाहत्यांकडून एक खास सन्मान देण्यात आला. चाहत्यांनी सामना सुरू झाल्यानंतर आठ मिनिटे जागेवर जागेवर उभं राहत मानवंदना दिली. पण यामागचे नेमके कारण काय होते, जाणून घेऊया. आयपीएल २०२४ चा ७व्या सामन्यात सीएसकेने गुजरातवर ६३ धावांनी मात केली. गेल्या मोसमातील अंतिम फेरीतील दोन्ही संघ या सामन्यादरम्यान आमनेसामने आले होते. गेल्या मोसमातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला होता. ज्यात विजय मिळवत सीएसकेने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.

चेन्नईच्या या अंतिम सामन्यातील विजयात रवींद्र जडेजा हिरो ठरला होता. त्याने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर चौकार मारून चेन्नईला चॅम्पियन बनवले. आता त्याच रवींद्र जडेजाला चेपॉकमध्ये त्याच फायनलिस्ट संघाविरुद्ध विशेष सन्मान दिला.

ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

CSK चे सर्व चाहते आणि सोशल मीडिया अकाउंट्सने (Whistlepodu Army) ही मानवंदना देण्याची घोषणा केली होती. अधिकृत इंस्टाग्रामवर एक विशेष पोस्ट या सामन्यापूर्वी करण्यात आली होती आणि त्यात लिहिले होते की, आयपीएल २०२४चा सातवा सामना सुरू झाल्यानंतर, ठीक ७.३८ वाजता, चेपॉकमध्ये उपस्थित असलेले सर्व चाहते रवींद्र जडेजाला मानवंदना देण्यासाठी त्यांच्या जागेवर उभे राहतील. विशेष म्हणजे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झाला. पण चाहत्यांनी ७.३८ ही वेळ का निवडली यामागे खास कारण आहे.

जडेजाचे फायनलमधील कामगिरीसाठी आभार मानत त्याला मानवंदना देण्यासाठी ७.३८ ही वेळ निवडली. कारण, जडेजाचा जर्सी क्रमांक हा ८ आहे आणि म्हणूनच आठ मिनिटे चाहते आपापल्या जागेवर उभे होते.

२०२३ च्या फायनलमध्ये रवींद्र जडेजाने फक्त ६ चेंडू खेळले पण मात्र या सहा चेंडूत तो संपूर्ण सामन्याचा हिरो ठरला. त्याने ६ चेंडूत १५ धावांची नाबाद खेळी खेळली. पण त्याची खेळी संघासाठी निर्णायक क्षणी खूपच महत्त्वाची ठरली कारण गुजरातचा विजय निश्चित दिसत होता. पण जडेजाने हा अटीतटीचा सामना चेन्नईच्या बाजूने वळवत संघाला चॅम्पियन बनवले. यानंतर एमएस धोनीने त्याला उचलून घेत सेलिब्रेशन केले. हा क्षण आयपीएलमधील फोटो ऑफ द सीझनपेक्षा कमी नव्हता.