RCB vs PBKS IPL Final 2025 Tickets: यंदा नवा आयपीएल विजेता संघ मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे संघ प्रथमच स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांविरूद्ध भिडणार आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात हे दोन्ही संघ भिडले होते. जिथे आरसीबीने पंजाबला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. तर पंजाब किंग्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध ३ विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आता या अटीतटीच्या सामन्याची तिकिट कुठे मिळणार, जाणून घ्या.
२ महिन्यांहून अधिक काळ ७० लीग सामने आणि तीन प्लेऑफ सामन्यांनंतर, २०२२ नंतर पहिल्यांदाच नवीन चॅम्पियन पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. ३ जून रोजी अहमदाबादमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफी विजयासाठी भिडणार आहेत. या मोठ्या सामन्याची तिकिटं कशी खरेदी करायची यावर आपण एक नजर टाकू.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याची तिकिटे २६ मे पासून District.in वेबसाइटवर लाइव्ह आहेत. वेबसाइटनुसार अधिक तिकिटे लाइव्ह आहेत.
ऑफिशियल पार्टनर: डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो हे आयपीएल २०२५ प्लेऑफसाठी तिकिट विक्री करणारा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे.
RuPay कार्डधारक: RuPay कार्डधारकांना २६ मे रोजी २४ तास आधी तिकिटे खरेदी करण्याची संधी मिळाली.
सर्वसामान्यांसाठी: २७ मे पासून डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो वेबसाइट आणि अॅपवर तिकिटं उपलब्ध आहेत.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत किती आहे?
बैठक श्रेणी आणि उपलब्धतेनुसार किमती वेगवेगळ्या आहेत.अंदाजांनुसार, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या किमती सामान्य स्टँडसाठी सुमारे १ हजार ते प्रीमियम हॉस्पिटॅलिटी बॉक्ससाठी २० हजार किंवा त्याहून अधिक असतात.
RCB vs PBKS IPL 2025 Final सामन्याची तिकिटx कशी खरेदी करता येणार?
झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट अॅपवरून (district.in) तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकता.
district.in/events/ipl-ticket-booking ला भेट द्या
इच्छित सामना निवडा आणि सामन्याच्या ठिकाणावर क्लिक करा, म्हणजेच पंजाब वि. आरसीबी
पुढील टॅबवर जाण्यासाठी ‘Book Tickets’ बॉक्सवर क्लिक करा.
तुमच्या आवडीनुसार स्टँड आणि सीट्स निवडा आणि त्या कार्टमध्ये जोडा.
फोन नंबर आणि लॉग इन डिटेल्स देत तिकिटं कन्फर्म करा.
पेमेंट पद्धत निवडा आणि तिकिटाची किंमत द्या.