कर्णधार रोहित शर्माच्या ५४ चेंडूतील ८० धावांच्या खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने काल कोलकाता नाईट रायडर्सवर ४९ धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “संयुक्त अरब अमिरातीच्या उष्ण आणि दमट वातावरणात खेळणे इतकं सोपं नाही. या वातावरणात शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होते. डावाच्या अखेरीस मी दमलो होतो. आमच्यासाठी एक धडा आहे, सेट झालेल्या फलंदाजाने अखेरपर्यंत फलंदाजी केली पाहिजे.”
या सामन्यात रोहितने मधल्या षटकात पुल फटक्यांचा खुबीने वापर केला व काही षटकारही लगावले. “कुठला एक फटका निवडता येणार नाही. माझे सगळेच फटके चांगले लागले. एकूणच संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे” असे रोहित म्हणला.
रोहित शर्माने IPLमध्ये सर्वाधिक १८ मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला. त्यानं महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) ला मागे टाकले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच जिंकणाऱ्या खेळाडूमध्ये रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. रोहित शर्माने डेविड वॉर्नर आणि एम. एस. धोनी यांचा विक्रम मोडला आहे.