Irfan Pathan Tells The Reason Behind SRH Defeat : इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी डबल हेडरचा धमाका पाहायला मिळाला. पहिला सामना हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात रंगला. लखनऊने या सामन्यात सनरायझर्सचा ७ विकेट्सने पराभव केला. लखनऊसमोर एसआरएसने विजयासाठी १८३ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्यानंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये हैद्राबादने सामन्यात विजयाच्या दिशेनं वाटचाल केली होती. लखनऊला शेवटच्या पाच षटकांत ६९ धावांची गरज होती. म्हणजेच प्रत्येक षटकात १४ धावा कराव्या लागणार होत्या. हैद्राबादच्या समर्थकांनी त्यांना विजय मिळाला असल्याचं जवळपास निश्चितच केलं होतं. पण इनिंगच्या शेवटच्या टप्प्यात हैद्राबादचा कर्णधार मार्करमने एक चूक केली. ज्यामुळे हातात आलेला सामना त्यांच्याकडून निसटला.

मार्करमने अभिषेक शर्माला षटक दिलं होतं. परंतु, याच षटकात सुरुवातीच्या दोन चेंडूवर मार्कस स्टॉयनिसने दोन षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. पण पुढच्या तीन चेंडूवर निकोलस पूरनने तीन षटकार ठोकले. त्या षटकात एका वाईडला मिळून लखनऊच्या संघाला ३१ धावा मिळाल्या आणि सामना पूर्णपणे लखनऊच्या खिशात गेला. याबाबत भारताचा माजी गोलंदाज इरफान पठानने प्रतिक्रिया दिलीय.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…

नक्की वाचा – IPL 2023, SRH vs LSG: निकोलस पूरनचा धमाका! प्रेरकच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊचा SRH वर दणदणीत विजय

पठानने ट्वीट करत म्हटलं, “टी-२० फॉर्मेटमध्ये इनिंगचं १६ वे षटक पार्टटायमर गोलंदाजाला देणं चूक नाही तर ब्लंडर आहे. लीगचा सर्वात वेगवान गोलंदाज डगआऊटमध्ये बसून राहिल्यामुळे मी नाराज आहे. मॅनेजमेंटने उमरान मलिकला चांगल्या प्रकारे नियंत्रित केलं नाही.” लखनऊने पराभव केल्यानंतर हैद्राबाद आता ११ सामन्यांत ४ विजय आणि ७ पराभवांमुळे गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे हैद्राबादचा यंदाच्या आयपीएलमधून पत्ता कट झाला असल्याची चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे.