आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी भिडणार आहेत. या सामन्यात आरसीबीचा लकी चार्म खेळाडूही खेळणार आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या सर्व अंतिम सामन्यांमध्ये त्याच्या जबरदस्त कामगिरीने त्याच्या संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. आता हाच वेगवान गोलंदाज विराट कोहलीला पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावू शकतो.

आरसीबीचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेझलवुड आहे. आरसीबी संघाने त्याला आयपीएल २०२५ च्या हंगामाच्या लिलावात १२.५० कोटी रुपयांना संघात सामील केले. त्यानंतर, त्याने चालू हंगामात आरसीबीसाठी भेदक गोलंदाजी करत संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला.

हेझलवुडने २०१० मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८.४ षटकांत ३० धावा देऊन पाकिस्तानचे चार बळी घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया चॅम्पियन बनला. २०१० नंतर, २०१२ च्या चॅम्पियन्स लीग टी२० च्या अंतिम सामन्यात, हेझलवूडने सिडनी सिक्सर्सकडून २२ धावा देत तीन विकेट्स घेतल्या आणि संघाला जेतेपद जिंकण्यास मदत केली.

२०१४ च्या शेफील्ड शिल्डच्या अंतिम फेरीत न्यू साउथ वेल्सकडून खेळताना, त्याने २२ षटकांत ५० धावा देत ६ विकेट्स घेतल्या आणि सामना अनिर्णित राहिला परंतु पॉइंट टेबलमध्ये पुढे असल्याने संघ विजेता ठरला. २०१९-२० च्या बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात त्याने १८ धावा देत तीन विकेट्स घेतल्या, तर २०२१ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध ४ षटकांत १६ धावा देत तीन विकेट्स घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ च्या अंतिम सामन्यात त्याने चेन्नईसाठी २९ धावा देत दोन विकेट्स घेतल्या आणि २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकाव्यतिरिक्त, २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने १० षटकांत ६० धावा देत दोन विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे, हेझलवूडने आतापर्यंत सहा फायनल खेळल्या आहेत आणि त्या सर्वांमध्ये त्याचा संघ चॅम्पियन बनला आहे. त्यामुळे, त्याच्या नशिबाच्या मदतीने, आरसीबी आता आयपीएल २०२५ मध्ये जेतेपद जिंकून १७ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.