KKR captain Nitish Rana Statement: कोलकाता नाईट रायडर्सचा नवनियुक्त कर्णधार नितीश राणाने मंगळवारी सांगितले की, आपण दिलेल्या जबाबदारीसाठी तयार आहोत. मात्र, कर्णधारपदाच्या शैलीबाबत त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. केकेआरने (KKR) सोमवारी डावखुरा फलंदाज नितीश राणाला आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामासाठी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. राणा श्रेयस अय्यरची जागा घेईल. ज्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याला संपूर्ण हंगामासाठी खेळू शकणार नाही.

नितीश राणा २०१८ पासून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग –

नितीश राणा गेल्या तीन हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा चौथा कर्णधार असेल. यापूर्वी दिनेश कार्तिक, इयान मॉर्गन आणि अय्यर यांनी कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. नितीश राणा २०१८ पासून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. त्याचबरोबर केकेआरच्या नेतृत्व गटाचा एक भाग देखील राहिला आहे. राणाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या १२ सामन्यांमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे, परंतु त्याला आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. तथापि, नितीश राणाचे एक वि जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पत्रकाराने त्याला विचारले की कर्णधारपदाचा विचार करताना तुमचा आदर्श कोण आहे, ज्यावर त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.

मला माझ्या शैलीने नेतृत्व करायचे आहे –

एका पत्रकाराने नितीश राणाला विचारले की, तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधार होता, पण कर्णधारपदाच्या बाबतीत तुम्ही कोणाला आदर्श मानता? तुम्ही धोनी, रोहित, कोहली आणि त्याआधी गांगुलीला पाहिले आहे, तुम्ही कोणाला फॉलो करता? यावर राणाने मजेशीर उत्तर दिले. नितीश राणा म्हणाला, राणा म्हणाला, “मला कोणाचेही अनुकरण करायचे नाही. मला माझ्या पद्धतीने नेतृत्व करायचे आहे. मला माहित आहे की मी जर एखाद्याला फॉलो करायला लागलो तर मी स्वतःला कुठेतरी हरवून बसेन. मला माझ्या शैलीने नेतृत्व करायचे आहे आणि माझ्या पद्धतीने पुढे न्यायचे आहे.”

हेही वाचा – IPL 2023:’क्रिकेट खेळायचो म्हणून वडील बेल्टने मारायचे’, बालपण आठवून भावूक झाला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणा पुढे म्हणाला, “हे फक्त दादांबद्दल नाही. गौतम गंभीर, इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, श्रेयस या सर्व मोठ्या टूर्नामेंटमध्ये मी अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे. दादांच्या हाताखाली मी कधीच खेळलो नाही. पण त्यांनी भारतीय क्रिकेटला कोणत्या स्तरावर नेले हे सर्वांनाच माहीत आहे. मला वाटतं, खूप काही शिकण्यासारखे आहे, पण प्रत्येकाची स्वतःची एक कर्णधारपदाची शैली असते. तुम्ही धीर धरा आणि प्रतीक्षा करा आणि मग तुम्हाला माझ्या कर्णधारपदाच्या पद्धती कळतील आणि त्याबद्दल बोलावे असे मला वाटते.”