Rajasthan Royals And Gujrat Titans Playing 11 : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामातील ४८ वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा गुजरात टायटन्सच्या संघाचा मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पाच धावांनी पराभव केला. मात्र, टीमला १२ गुण मिळाल्याने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर राजस्थान १० गुण मिळाल्याने चौथ्या स्थानावर आहे.
संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघात चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. परंतू टीमला सलग विजय मिळवण्यात अपयश येत आहे. मागील सहा सामन्यांमध्ये राजस्थानने तीन सामन्यांत विजय संपादन केलं आहे. तर तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सला चांगली गोलंदाजी करण्याकडे अधिक भर द्यावा लागणार आहे. वेगवाग गोलंदाज ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर, फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि कुलदीप सेनचा फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला.
गुजरात टीमला दाखवावा लागेल फलंदाजीचा जलवा
दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. गुजरातचे धडाकेबाज फलंदाज शुबमन गिल आमि डेव्हिड मिलर स्वस्तात माघारी परतल्याने टीमला १३१ धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आलं. कर्णधार हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी करून गुजरातला विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पांड्या आणि राहुल तेवतीयाच्या खेळीनं संघाला विजय मिळवून दिलं नाही. टीमची गोलंदाजी मजबूत स्थितीत आहे. मोहम्मद शामी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नूर अहमदही गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११
राजस्थान रॉयल्स: जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल/कुलदीप यादव (इम्पॅक्ट प्लेयर), शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, आर अश्विन, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट.
गुजरात टाइटन्स: शुभमन गिल/मोहित शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि जोश लिटिल.