गेल्या आठवड्यात, इंडियन प्रीमियर लीग रोमांचक सामन्यांमुळे तसेच त्यातील वादांमुळे चर्चेत होती. भारतातील दोन प्रमुख क्रिकेटपटू विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसत होते. एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी हस्तांदोलन केले नाही आणि एकमेकांकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणाने चांगलाच पेट घेतला आणि सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा झाली. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सौरव गांगुली आणि विराट कोहलीच्या हस्तांदोलनाच्या कथेवर स्पष्ट विधान केले आहे.

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यानंतर विराट कोहलीने सौरव गांगुलीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे वृत्त समोर आले आणि गांगुलीनेही तसेच केले. दोघांमधील तणाव वाढत असताना, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना याबद्दल विचारण्यात आले की ते परिस्थिती कशी सोडवतील. या प्रश्नाला शास्त्री यांनी बिनधास्तपणे उत्तर दिले.

हेही वाचा: IPL 2023: चहलच्या मनात अढी कायम? युजीच्या मते, रोहित, विराट नव्हे तर ‘हा’ खेळाडू होणार धोनीसारखा सर्वोत्तम कर्णधार

ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणातात की, “त्यादोघांमध्ये हे नाते काय आहे, यावर सारे काही अवलंबून आहे. जर मला याबाबतीत बोलायचे नसेल तर मी ते सोडून देईन, पण शेवटी जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मनात जी जागा बनवतात तेव्हा तुमचे वय कितीही असले किंवा तुम्ही कितीही मोठी व्यक्ती असू दे. त्याने काही फरक पडत नाही. ते मनावर कायमस्वरूपी कोरले जाते आणि लक्षात राहून जाते. आणि ती व्यक्ती भविष्यात पुढे तेच मनात ठेवून वागते.” असं म्हणत रवी शास्त्री यांनी गांगुलीला टोला लगावला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२०२१ मध्ये कोहलीला एकदिवसीय आणि टी२० कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना सांगितले की, “एकदिवसीय कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी कोहलीशी बोलणे झाले होते आणि त्याच्या संमतीनंतर ते निर्णय झाले. बीसीसीआयने विराटला टी२० कर्णधारपद न सोडण्यास सांगितले होते, पण विराटने ते मान्य केले नाही आणि राजीनामा दिला, असे गांगुलीने सांगितले होते.” त्याचवेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ठेवण्याचा निर्णय निवडकर्त्यांना आवडला नाही. यानंतर त्याने चेतन शर्मासोबत विराटशी संवाद साधला आणि त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली होती. त्यानंतरच रोहितला वन डे कर्णधार बनवण्यात आले.

हेही वाचा: LSG vs GT पांड्या बंधुंचा स्वॅगच न्यारा! आधी स्लेजिंग अन् नंतर एकमेकांची जर्सी… पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोहलीने गांगुलीचे विधान चुकीचे सांगितले

यानंतर विराटने पत्रकार परिषदेत गांगुलीचे बोलणे चुकीचे ठरवले आणि सांगितले की, “त्याला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ९० मिनिटांपूर्वी सांगितले होते की आता त्याच्या जागी रोहित वन डे संघाचा कर्णधार असेल.” यापूर्वी बीसीसीआयने त्याच्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती. कोहली म्हणाला, “जेव्हा मी टी२० चे कर्णधारपद सोडले तेव्हा मी पहिल्यांदा बीसीसीआयमध्ये गेलो होतो. त्यांना त्यांच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. मी माझे विचार आणि चिंता मांडल्या. मंडळाने ते मान्य करून माझ्या अडचणी समजून घेतल्या. एकदाही त्यांनी मला माझ्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले नाही.”