आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४८ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पंजाब किंग्जने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सला आठ गडी आणि चार षटके राखून धूळ चारली. शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि लियाम लिव्हिंगस्टोन या त्रिकुटाने पंजाबला विजय मिळवून दिला. लियाम लिव्हिंगस्टोनने तर षटकार आणि चौकार यांचा पाऊस पाडत अवघ्या सहा चेंडूंमध्ये सामना संपवला. त्याने या सामन्यात सर्वात लांब षटकार लगावण्याची किमया केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> IPL 2022 RCB vs CSK : आज चेन्नई-बंगळुरु आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने गुजरातविरोधात फलंदाजी करताना आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वात लांब षटकार लगावला आहे. मोहम्मद शमी गोलंदाजी करण्यासाठी आलेला असताना लियामने सोळाव्या षटाकात ही किमया केली. पहिल्याच चेंडूवर त्याने तब्बल ११७ मीटर लांबीचा षटकार लगावला. हा षटकार या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार आहे.

हेही वाचा >>> लियामचे षटकार अन् धवनच्या अर्धशतकामुळे पंजाबचा विजय, गुजरातचा या हंगामातील दुसरा पराभव

लियामने सहा चेंडूंमध्ये सामना संपवला

गुजरातने विजयासाठी दिलेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा जॉनी बेअरस्टो अवघी एक धाव करुन तंबुत परतला. त्यानंतर शिखर धवनने अर्धशतकी खेळी करत नाबाद ६२ धावा केल्या. त्याने ५३ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि एक षटकार लगावत ६२ धावा केल्या. धनवनला लियाम लिव्हिंगस्टोनने साथ दिली. त्याने फक्त दहा चेंडूंमध्ये दोन चौकार आणि तीन षटकार लगावत ३० धावा केल्या. एका षटकात त्याने सामना संपवला

हेही वाचा >> राहुल तेवतियाला राग अनावर, भर मैदनात साई सुदर्शनवर भडकला, पाहा व्हिडीओ

लगावला सर्वात लांब षटकार

मोहम्मद शमी सोळावे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनने जोराचा फटका मारत षटकार लगावला. हा षटकार ११७ मीटर लांबीचा होता. म्हणजेच या हंगामात आतापर्यंत सर्वात लांब षटकार लगावण्याचा विक्रम लिव्हिंगस्टोनने त्याच्या नावावर नोंदवला. लियाम लिव्हिंगस्टोनने या षटकात एकापाठोपाठ तीन षटकार आणि दोन चौकार लगावत सामना संपवला. लिव्हिंगस्टोनच्या या धमकेदार खेळीमुळे पंजाबच्या खात्यावर दोन गुण जमा झाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liam livingstone smashed longest 117 meter six of ipl 2022 season prd
First published on: 04-05-2022 at 16:22 IST