IPL 2025 LSG vs RCB Match Updates: आयपीएल २०२५ च्या लीग स्टेजमधील अखेरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला जात आहे. यासह प्लेऑफच्या दृष्टीने देखील हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात जर आरसीबीचा संघ जिंकला तर टॉप-२ साठी क्वालिफाय करू शकतो. पण या महत्त्वाच्या सामन्यातच जितेश शर्माने मोठी चूक केली आहे.

दोन्ही संघ चालू हंगामात प्रथमच एकमेकांविरूद्ध खेळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) १३ आयपीएल सामन्यांतून ८ विजय, ४ पराभवांसह १७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला टॉप-२ मध्ये राहून क्वालिफायर-१ मध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना कोणत्याही किंमतीत लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध जिंकावे लागेल. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेले लखनौ सुपर जायंट्स देखील हंगामाचा शेवट विजयाने करू इच्छितात.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामन्याची नाणेफेक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जितेश शर्मा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत आहे. संघाचा नियमित कर्णधार रजत पाटीदारच्या बोटाला दुखापत झाल्याने तो या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल. पण जितेश शर्मा नाणेफेक जिंकल्यानंतर चुकीची प्लेईंग इलेव्हन यादी दिली.

जितेश शर्माने नाणेफेकीनंतर चुकीची प्लेईंग इलेव्हन दिली. ज्यामध्ये प्रथम गोलंदाजी करत असल्याने रजत पाटीदार इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार होता, पण चुकून त्याने रजत प्लेईंग इलेव्हनमध्ये असलेली प्लेईंग इलेव्हन दिली. यानंतर त्याने मॅच रेफरी आणि लखनौ सुपर जायंट्सला विनंती करून प्लेईंग इलेव्हन बदलण्याची मागणी केली. लखनौने ही विनंती मान्य करत प्लेईंग इलेव्हन बदलण्याची परवानगी दिली.

लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन

मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरुक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग इलेव्हन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, सुयश शर्मा