Manoj Tiwari criticizes Glenn Maxwell : मंगळवारी आयपीएल २०२४ मधील १५वा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने बंगळुरुचा २८ धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने पुन्हा एकदा संघांची निराशा केली. त्यामुळे मनोज तिवारीने मॅक्सवेलवर टीका केली आहे.

ऑस्ट्रेलियन स्टारने चालू हंगामात सातत्याने खराब कामगिरी केली आहे. त्याला २ सामन्यांत खातेही उघडता आलेले नाही. त्याने चार सामन्यांत ०, ३, २८ आणि ० धावा केल्या आहेत. त्याच्या खराब खेळाचा आरसीबीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. संघाला ४ पैकी फक्त १ सामना जिंकता आला आहे. आता माजी भारतीय खेळाडू मनोज तिवारीने ग्लेन मॅक्सवेल सडकून टीका केली आहे.

आयपीएलच्या १७व्या हंगामापूर्वी, आरसीबी सर्वात मजबूत फलंदाजीचा क्रम असलेल्या संघांपैकी एक मानला जात होता, परंतु आतापर्यंत बंगळुरू संघाने आपल्या चाहत्यांची निराशा केली आहे. भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारीने ग्लेन मॅक्सवेलवर जोरदार टीका केली आहे. तो म्हणाला की मॅक्सवेल फक्त त्याचा पगार घेतो. संघासाठी कामगिरी न करून तो आरसीबीचा विश्वास तोडत आहे. त्याच्या खराब प्रदर्शनाचा आरसीबीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. संघाला ४ पैकी फक्त १ सामना जिंकता आला आहे.

हेही वाचा – IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीवर उपस्थित केला प्रश्न –

कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये खेळलेला तिवारी म्हणाला, “आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने मॅक्सवेलला कायम ठेवून आत्मविश्वास दाखवला आहे, परंतु तो वेळोवेळी फक्त पगार घेत आहे आणि संघासाठी सामना जिंकवणारी कामगिरी करू शकत नाही.” मॅक्सवेलला लखनऊविरुद्ध खाते उघडता आले नाही आणि मयंक यादवच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याचवेळी, अनुज रावत २१ चेंडूत केवळ ११ धावा करू शकला. त्याला मार्कस स्टॉइनिसने बाद केले.

हेही वाचा – IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

अनुज रावतवरही साधला निशाणा –

क्रिकबझशी बोलताना मनोज तिवारीने सांगितले की, “आरसीबीला नेहमीच फलंदाजांनी भरलेला संघ म्हणून पाहिले जाते, परंतु या क्षणी ना फलंदाज धावा करत आहेत, ना गोलंदाज विकेट्स घेऊ शकत आहेत. अनुज रावतने पहिल्या सामन्यात मधल्या फळीत इतकी चांगली कामगिरी केली होती, पण स्वभावाच्या कमतरतेमुळे तो डाव पुढे नेण्यास सक्षम नाही. तो नवा खेळाडू आहे हे समजू शकतो, पण अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या खेळाडूंसोबत वेळ घालवूनही शिकता येत नसेल, तर लक्ष दुसरीकडे जात आहे.”