Siddharth Jadhav Viral Video : आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सची लोकल सुसाट धावत आहे. सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने एका पाठोपाठ एक सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी दमदार खेळ केला आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं केलं.

मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर वानखेडे स्टेडियमवर जोरदार जल्लोष झाला. क्रिकेट चाहत्यांसह मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील हा सामना पाहण्यासाठी स्टँडमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

मुंबई इंडियन्सकडून सिद्धार्थ जाधवला मोठं गिफ्ट

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावत असतो. तुम्ही अनेकदा त्याला क्रिएटर बॉक्समधून मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करताना पाहिलं असेल. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला खास गिफ्ट दिलं. ज्याचा व्हिडीओ सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिद्धार्थ जाधव आपल्या जर्सीचा नंबर सांगताना दिसून येत आहे. आपल्या आवडत्या संघाची जर्सी गिफ्ट म्हणून मिळणं ही प्रत्येक चाहत्यासाठी अतिशय आनंदाची बाब असते. मुंबई इंडियन्सने जर्सी गिफ्ट केल्यानंतर सिद्धार्थ जाधवचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला.

मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या १२१ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना ५९ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.