पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदरबाद या दोन संघांमधील सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने विजयासाठी पंजाबसमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले. तर या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल तर फक्त एक धाव करु शकला. हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या चेंडूचा सामना करताना अग्रवाल बालंबाल बचावला.

हेही वाचा >> लियाम लिव्हिंगस्टोनने केली कमाल, एका हाताने टीपला अभिषेक शर्माचा अफलातून झेल

पंजाबच्या ६६ धावा झालेल्या असताना कर्णधार मयंक अग्रवाल फलंदाजीसाठी आला. त्याने मैदानावर टिकून राहत धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फक्त एक धाव करु शकला. संघाच्या ७१ धावा असताना तो वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर झेलबाद झाला. विशेष म्हणजे सातव्या षटकात उमरान मलिकच्या चेंडूवर त्याला दुखापत झाली. उमरान मलिकने टाकलेला चेंडू अग्रवालच्या बरगडीला लागला. जोरात मार लागल्यामुळे अग्रवाल थेट जमिनीवर झोपला होता. त्यानंतर पेनकिलर घेऊन त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र या डावात तो फक्त एक धाव करु शकला.

हेही वाचा >> आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, उमरान मलिक, दिनेश कार्तिकला संधी; विराटला विश्रांती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी सनरायझर्सच्या फलंदाजांनी चांगली खेळी करत संघाचा धावफलक १५७ धावांपर्यंत नेऊन ठेवला. अभिषेक शर्माने ४३ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर (२५) आणि रोमारिओ शेफर्ड याने २६ धावा केल्या. या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली खेळी केल्यामुळे हैदराबाद संघ समाधानकारक धावसंख्या उभारू शकला.