आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. Star Sports वाहिनीवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामने आणि मयांती लँगर हे समीकरण पक्क झालं होतं. आपल्या सदाबहार शैलीने अँकरिंग करत क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेणाऱ्या मयांतीचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. परंतू या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा ही मयांती लँगरविनाच त्यांना पहायला लागणार आहे.
आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळालेल्या Star Sports वाहिनीने आगामी हंगामासाठी नवीन अँकर आणि प्रेझेंटर्सची यादी जाहीर केली आहे. ज्यात मयांती लँगरला स्थान देण्यात आलेलं नाही. सुरेन सुंदरम, किरा नारायणन, सोहेल चांढोक, नशप्रीत कौर, संजना गणेशन, जतीन सप्रू, तान्या पुरोहित, अनंत त्यागी, धीरज जुनेजा आणि नेरोली मेडोव्ज यांना यंदा संधी देण्यात आलेली आहे.
Hi! Mayanti Langer won't be a part of #Dream11IPL 2020.
— Star Sports (@StarSportsIndia) September 17, 2020
मयांतीला यंदाच्या यादीत स्थान न देण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आयपीएलसोबत मयांती लँकरने अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये काम केलं आहे. भारतातील सर्वात प्रभावशाली महिला Sports Anchor मध्ये मयांतीचं नाव घेतलं जातं. त्यामुळे मयांतीला यंदा संधी न दिल्यामुळे चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.