GT vs LSG, Mitchell Marsh Record: लखनऊ सुपर जायंट्स संघातील फलंदाजांना शेवटच्या सामन्यांमध्ये सूर गवसला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी चांगलाच हल्लाबोल केला. लखनऊकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि एडन मार्करमची जोडी मैदानावर आली. गुजरातच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांना सुरूवातीला धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे लखनऊचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. पावरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी कागिसो रबाडा गोलंदाजीला आला. या षटकात लखनऊच्या फलंदाजांनी १५ धावा चोपल्या. इथून लखनऊच्या फलंदाजांनी संघाची धावसंख्या ५३ धावांवर पोहोचवली.

राशिद खानच्या षटकात मिचेल मार्शची तुफान फटकेबाजी

मिचेल मार्शची तुफान फटकेबाजी सुरू असताना शुबमन गिलने चेंडू राशिद खानच्या हातात दिला. मात्र, राशिदला आपल्या अनुभवाचा फायदा घेता आला नाही. त्याने आपल्या पहिल्याच षटकात २५ धावा चोपल्या. या षटकात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शेवटचा एक चेंडू सोडला तर चेंडू सीमारेषेच्या पार गेले. या डावात फलंदाजी करताना त्याने ५६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ६ षटकार खेचले.

असा रेकॉर्ड करणारा आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिलाच फलंदाज

हे शतक मिचेल मार्शसाठी अतिशय खास ठरलं आहे. कारण याआधी आयपीएल २०२५ स्पर्धेत सहा फलंदाजांनी शतक झळकावली होती. हे सर्व भारतीय फलंदाज होते. मिचेल मार्श हा आयपीएल २०२५ स्पर्धेत शतक झळकावणारा सातवा फलंदाज ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य बाब म्हणजे तो या हंगामात शतक झळकावणारा पहिलाच परदेशी फलंदाज ठरला आहे. यासह मार्शने या डावात फलंदाजी करताना ६४ चेंडूत ११४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २३५ धावांवर पोहोचवली.