Most Explosive Inning In IPl History : इंडियन प्रीमियर लीगने टी-२० क्रिकेटचा रोमांच अधिकच वाढवला आहे. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली अन् बघता बघता ही टूर्नामेंट वर्षानुवर्षे लोकप्रिय होत गेली. देश-विदेशातील धाकड खेळाडूंनी या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे. टूर्नामेंटच्या स्फोटक खेळीबाबत बोलायचं झालं तर, ख्रिस गेलची १७५ धावांची वादळी खेळी सर्वांनाच आठवत असेल. या लिस्टमध्ये ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. पण त्यानंतर कोणत्या फलंदाजांनी बाजी मारली आहे, याबाबत जाणून घेऊयात. इंडियन प्रीमियर लीगच्या स्फोटक खेळीमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडला आहे. टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात आक्रमक खेळी ख्रिस गेलच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. २०१३ मध्ये ख्रिस गेलने वादळी दीड शतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. एकाच इनिंगमध्ये सर्वात जास्त चौकार आणि षटकार ठोकण्याचा विक्रम आजतागायत कोणत्याच खेळाडूने मोडला नाही. नक्की वाचा - IPL इतिहासातील ‘नर्व्हस ९९’; शतकाच्या उंबरठ्यावर असताना ‘या’ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता आयपीएलमधील सर्वात आक्रमक खेळी ख्रिस गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरोधात झालेल्या सामन्यात नाबाद १७५ धावांची वादळी खेळी केली होती. या इनिंगमध्ये गेलने १३ चौकार आणि १७ षटकार ठोकले होते. टूर्नामेंटच्या इतिहासात एकाच इनिंगमध्ये सर्वात जास्त चौकार ठोकण्याची नोंद या सामन्यात करण्यात आली होती. या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर ब्रेंडन मॅक्यूलमच्या नावाची नोंद करण्यात आलीय. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना मॅक्यूलमने आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये नाबाद १५८ धावांची दीड शतकी खेळी केली होती. या इनिंगमध्ये त्याने १० चौकार आणि १३ षटकार ठोकले होते. तसंच या लिस्टच्या तिसऱ्या क्रमांकावरही ख्रिस गेलच्या नावाची नोंद झालीय. डेक्कन चार्जर्स विरोधात झालेल्या सामन्यात ख्रिस गेलने नाबाद १२८ धावांची शतकी खेळी केली होती. या इनिंगमध्ये गेलने ७ चौकार आणि १३ षटकार ठोकले होते.