Dream11 IPL 2020 UAE: सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. सौरभ तिवारीच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या विजयासह IPLमध्ये महेंद्रसिंग धोनी एक विक्रम केला.
महेंद्रसिंग धोनीने मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना हा धोनीचा १००वा विजय ठरला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीने IPLमध्ये कर्णधार म्हणून एकूण १०५ विजय मिळवले आहेत, पण त्यातील ५ विजय त्याने पुणे वॉरियर्स संघासाठी मिळवले होते.
100 wins as @ChennaiIPL Captain for @msdhoni #Dream11IPL #MIvCSK pic.twitter.com/jZ91EcCJyF
— IndianPremierLeague (@IPL) September 19, 2020
असा रंगला सामना-
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्या (१४), कृणाल पांड्या (३) आणि कायरन पोलार्ड (१८) यांनी निराशा केली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
Half-centuries from Faf du Plessis and Ambati Rayudu propel #ChennaiSuperKings to a 5 wicket win in the season opener of #Dream11IPL
Scorecard – https://t.co/HAaPi3BpDG #MIvCSK pic.twitter.com/6ebpiThrja
— IndianPremierLeague (@IPL) September 19, 2020
१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. दोन गडी स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. रायडूने ७१ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.