Robin Uthappa on MS Dhoni: एमएस धोनी हा एक कर्णधार म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखला जातो ज्याची रणनीती सर्वात मोठ्या संघासमोर फ्लॉप होते. २०११ मध्ये भारताला विश्वचषक मिळवून देणारा धोनी आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळीही चाहत्यांना आशा आहे की माही भाईच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होईल.

कर्णधारपदाबाबत त्याचवेळी धोनीसोबत सीएसकेमध्ये खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने धोनीच्या रणनीतीबद्दल आपले मत मांडले आहे. “माहीभाईची तुमच्याविरुद्धची रणनीती अशी आहे की तुम्ही स्वतःवरच नाराज होतात, असेही त्याने सांगितले आहे. इच्छा नसतानाही तुम्ही चुका करता.” माहितीसाठी उथप्पा देखील आयपीएलमध्ये माही विरुद्ध खेळला आहे. यामुळेच उथप्पाने धोनीच्या रणनीतीबाबत आपले मत मांडले आहे.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: मयंक यादवने स्वतःचाच विक्रम मोडला, आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान

जिओ सिनेमावर बोलताना उथप्पाने धोनीच्या रणनीतीवर आपले मत मांडले आणि सांगितले की, “त्याची रणनीती अशी आहे की तो तुम्हाला ब्रेक नाही.” माहीभाईच्या खास स्ट्रॅटेजीवर रॉबिन उथप्पा म्हणाला, “जेव्हा मी सीएसकेविरुद्ध खेळायचो, तेव्हा त्याच्या स्ट्रॅटेजीमुळे माझी खूप चिडचिड व्हायची आणि तो नाही तसं केलं तर खूप भडकायचा. त्यानंतर मला धोनीचा खूप राग आला.”

हेही वाचा: Kavya Maran: कभी खुशी कभी गम! काव्या मारनचे क्षणोक्षणी बदलणारे हावभाव पाहून नेटकरी म्हणतात…

दुसऱ्या एका प्रसंगाची आठवण करून देताना उथप्पा पुढे  म्हणाला की, “एकदा जोश हेझलवूड माझ्यासमोर गोलंदाजी करत होता आणि माही भाईने त्याच्यासाठी कोणत्याही खेळाडूला फाईन लेगवर ठेवले नाही. अशा परिस्थितीत, दोघांमधील अंतर पाहून मी थोडा विचलित झालो, माझी एकाग्रता भंग झाली आणि पुढच्या चेंडूवर त्या ठिकाणी शॉट मारण्यासाठी आऊट झालो. तो तुम्हाला अशा ठिकाणी खेळण्यास भाग पाडतो जिथे तुम्हाला खेळण्याची सवय नाही आणि तुम्ही तुमची विकेट स्वतः काढून देता.”

धोनीबद्दल माजी फलंदाज म्हणाला, “तो फलंदाजांच्या मनाने खेळतो, तो फक्त फलंदाजांना वेगळा विचार करायला भाग पाडत नाही, तर गोलंदाजांनाही वेगळा विचार करायला भाग पाडतो. तो गोलंदाजाला अशा स्थितीत ठेवतो की गोलंदाजही विकेट घेण्याचा नक्की प्रयत्न करू लागतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. युवा खेळाडूंना त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.”

हेही वाचा: IPL 2023: हॅरी ब्रूकला आयपीएलमधील प्राईज टॅगचा दबाव जाणवत आहे? SRH स्टारच्या खराब प्रदर्शनावर माजी खेळाडूची टीका

माहितीसाठी, या वर्षी सीएसकेने आयपीएल मध्ये दोन सामने खेळले आहेत आणि एकात विजय आणि दुसऱ्यात पराभवाचा सामना केला आहे. आयपीएल २०२३च्या पहिल्या सामन्यात, गुजरातकडून चेन्नईला पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. आता CSK आपला पुढचा सामना ८ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.