Fastest Half Centuries In IPL 2023 : आयपीएल २०२३ मध्ये काही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. म्हणजेच फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेऊन धावांचा आलेख उंचावला आहे. या लीगमध्ये फलंदाजांचा नेहमीच बोलबाला राहिला आहे. आयपीएलमध्ये ज्या फलंदाजांनी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणून धावांचा डोंगर रचला आहे, अशा फलंदाजांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तीन फलंदाजांनी वेगवान अर्धशतक ठोकून सर्व विक्रमांना मोडीत काढलं आहे. या लिस्टमध्ये एका भारतीय फलंदाजाच्या नावाचाही समावेश आहे.

निकोलस पूरन

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Dinesh Karthik Hits 108 m Longest Six of IPL 2024
VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज
Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

या लिस्टमध्ये निकोलस पूरनचं नाव पहिलं आहे. पूरन लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळतो. आरसीबीसाठी खेळताना पूरनने १५ चेंडूत ६२ धावा कुटल्या होत्या. पूरनने ३२६.३१ इतक्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. या इनिंगमध्ये पूरनने ४ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते.

नक्की वाचा – ३६ सामन्यांमध्ये ‘असा’ शॉट पाहिला नसेल; यशस्वी जैस्वालच्या गगनचुंबी षटकाराची का होतेय चर्चा? Video एकदा पाहाच

जेसन रॉय

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज जेसन रॉय या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. जेसन रॉयने आयपीएल २०२३ मध्ये अप्रतिम खेळी करत अर्धशतक ठोकलं आहे. रॉयने १९ चेंडूत ६१ धावांची खेळी साकारली होती. या इनिंगमध्ये रॉयने ५ चौकार आणि ५ षटकार मारले होते. रॉयने २३४.६१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती.

अजिंक्य रहाणे

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेनं जबरदस्त फलंदाजी केली आहे. रहाणेनं मुंबईविरोधात खेळताना १९ चेंडूत ६१ धावांची आक्रमक खेळी केली. या इनिंगमध्ये रहाणेनं ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीनं वादळी अर्धशतक ठोकलं होतं.