People Garba Dance In Narendra Modi Stadium Video Viral : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील सर्वात महत्वाचा म्हणजेच फायनलचा सामना आज राखीव दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा रंगतदार सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या सलामीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. शुबमन गिलने ३९ तर ऋद्धीमान साहाने ३९ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर साई सुदर्शनने धडाकेबाज फलंदाजी करून ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकून ९६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली.

या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळल्याने सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. सामना थांबला पण स्टेडियममधील चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. भर पावसात चाहते गरबा खेळू लागल्याने मैदानात मनोरंजानाचा वर्षाव झाला. प्रेक्षकांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

नक्की वाचा – IPL 2023 Final: गिल-साहा बाद झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलं सुदर्शनचं वादळ, धडाकेबाज फलंदाजीचा Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

साई सुदर्शनची धडाकेबाज फलंदाजी

साईने चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकून ९६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. तत्पूर्वी, साईच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मथिशा पाथिरानाने साईला बाद केलं.