Sai Sudharsan Smashes Fours And Sixes Video Viral : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील सर्वात महत्वाचा म्हणजेच फायनलचा सामना आज राखीव दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा रंगतदार सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या सलामीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. शुबमन गिलने ३९ तर ऋद्धीमान साहाने ३९ धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु, गिल बाद झाल्यानंतर मैदानात साई सुदर्शनचं वादळ आलं.
साईने चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकून ९६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. तत्पूर्वी, साईच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मथिशा पाथिरानाने साईला बाद केलं.




इथे पाहा व्हिडीओ
शुबमनने आक्रमक फलंदाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. शुबमन चौफेर फटकेबाजी करत असताना चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीनं रणनिती आखली अन् रविंद्र जडेजाला गोलंदाजी दिली. त्यानंतर जडेजाने फसवा चेंडू फेकून शुबमनला चकवा दिला अन् धोनीनं गिलला ३९ धावांवर असताना स्टम्पिंग करून बाद केलं. शुबमनने २० चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. शुबमनचा झंझावात रोखण्यात धोनीला यश आलं. शुबमनला धोनीनं चालाखीनं स्टंम्पिंग केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.