Most Fours In IPL History: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी मैदानावर आली. मात्र, या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. फिल सॉल्ट स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर विराटने चौकार मारताच शिखर धवनचा आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या सामन्यातील पावरप्लेच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १ गडी बाद ५५ धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने अर्शदीपच्या पहिल्याच षटकात १३ धावा चोपून काढल्या. त्यानंतर काईल जेमिसन गोलंदाजीला आला. या षटकात फिल सॉल्ट बाद होऊन माघारी परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अवघ्या १८ धावांवर पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर मयांक अगरवाल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. या दोघांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मयांकने २४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराटने चौकार मारला. यासह विराटने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
विराटने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराटने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत ७६९ चौकार मारले आहेत. याआधी हा रेकॉर्ड माजी फलंदाज शिखर धवनच्या नावावर होता. शिखरने ७६८ चौकार मारले होते. आता ७६९ चौकारांसह सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट नंबर १ स्थानी पोहोचला आहे. या यादीत डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावे आयपीएल स्पर्धेत ६६३, रोहित शर्माच्या नावे ६४० आणि अजिंक्य रहाणेच्या नावे ५१४ चौकार मारण्याची नोंद आहे.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
विराट कोहली – ७६९
शिखर धवन- ७६८
डेव्हिड वॉर्नर- ६६३
रोहित शर्मा- ६४०
अजिंक्य रहाणे – ५१४
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड