Rishabh Pant angrily bat hitting side curtain video viral : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२४ मधील त्यांच्या मोहिमेला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करून सुरुवात केली आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असे कृत्य केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ पंतने आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन केले आहे.

ऋषभ पंतचा रागात बॅट आपटल्याचा व्हिडीओ व्हायरल –

आयपीएल २०२४ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार ऋषभ पंत आपल्या संघाच्या कामगिरीवर खूश नसेल. पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाचा पंजाब किंग्जकडून ४ गडी राखून पराभव झाला होता. आता राजस्थान रॉयल्सने देखील त्यांचा १२ धावांनी पराभव केला आहे आणि त्यांना गुणतालिकेत आठव्या स्थानावर ढकलले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही. ऋषभ पंतला लेगस्पिनर युजवेंद्र चहलने त्याच्या वैयक्तिक २८ धावांवर बाद केले. आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत खूप रागावलेला दिसत होता आणि ड्रेसिंग रूममध्ये जाताना असताना त्याने बाजूच्या पडद्यावर जोरात आपटली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

hardik Pandya
हार्दिक पांड्याची ‘ती’ चूक अन् मुंबईने सामना गमावला; माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या कर्णधाराला झापलं
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?

चहलने ऋषभ पंतला केले झेलबाद –

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १४व्या षटकात ही घटना घडली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लेगस्पिनर युजवेंद्र चहलने ऋषभ पंतला आपल्या जाळ्यात अडकवत झेलबाद केले. ऋषभ पंतने युजवेंद्र चहलचा वाईड बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटची कड चेंडूला लागली. यानंतर संजू सॅमसनने विकेटच्या मागे झेल घेत ऋषभ पंतचा डाव संपवला. आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत खूप रागावलेला दिसला. कारण त्यावेळी संघाला त्याची खूप गरज होती. त्याच्या अगोदर डेव्हिड वार्नर (४९) आऊट झाला होता आणि अशावेळी ऋषभने खेळपट्टीवर असणे खूप महत्वाचे होते. यामुळे त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतत असताना त्याने सीमारेषेच्या बाहेरील पडद्यावर बॅट जोरात आपटली. यावरुन ऋषभ पंत त्याच्या शॉट सिलेक्शनवर खूश नसल्याचं दिसत होते.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

ऋषभ पंतच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ऋषभ पंत २६ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. ऋषभ पंतच्या खेळीत १ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. रियान परागच्या ८४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला आणि सलग दुसरा विजय नोंदवला.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

आसामच्या २२ वर्षीय रियानने ४५ चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारून आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे संघाने शेवटच्या सात षटकांत ९२ धावा जोडल्या. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्यानंतर दिल्लीचा डाव पाच गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावांवर मर्यादी रोखला. आयपीएलच्या चालू मोसमातील नऊ सामन्यांतील घरच्या संघाचा हा नववा विजय आहे. राजस्थानचा हा दोन सामन्यातील दुसरा विजय आहे तर दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे.