Rajasthan Royals beat Delhi Capitals by 12 runs : आयपीएल २०२४ मधील नववा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. या रोमांचक सामन्यात राजस्थानने शेवटच्या षटकात दिल्लीचा १२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर राजस्थानने ५ बाद १८५ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात दिल्लीला ५ बाद १७३ धावांपर्यतच मजल मारता आली.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १८५ धावांची मोठी मजल मारली होती. रियान परागने ४५ चेंडूत नाबाद ८४ धावा करत राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या संघाने लवकर २ गडी गमावले असले, तरी ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरच्या ६७ धावांच्या भागीदारीने संघाचे पुनरागमन केले. शेवटच्या ५ षटकात दिल्लीला विजयासाठी ६६ धावांची गरज होती.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Action against Samson for slow over rate
IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?
RR vs DC will be played in the ninth match of IPL 2024
IPL 2024 : आज ऋषभ पंतच्या दिल्लीसमोर संजू सॅमसनच्या राजस्थानचे आव्हान; जयपूरमध्ये कोण मारणार बाजी?
ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

आवेश खानची शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी –

मात्र संघाचे फलंदाज सातत्याने बाद होत राहिले. त्यामुळे दिल्लीला हा सामना १२ धावांनी हरला आहे. दिल्लीकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. याशिवाय स्टब्सने २३चेंडूत ४३धावांची नाबाद खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. राजस्थान संघाकडून बर्गर आणि चहलने प्रत्येकी २ आणि आवेश खानने एक विकेट घेतली. आवेश खानने शेवटच्या षटकात राजस्थानसाठी अप्रतिम गोलंदाजी केली.

राजस्थान रॉयल्सची खराब सुरुवात –

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसनचा संघ फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसला. अवघ्या नऊ धावांच्या स्कोअरवर संघाला पहिला धक्का बसला. यशस्वी जैस्वाल केवळ पाच धावा करू शकला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीविरुद्ध राजस्थानने २६ धावांवर तीन विकेट गमावल्या. संघाला दुसरा धक्का जोस बटलरच्या रूपाने बसला तो केवळ ११ धावा करू शकला, तर संजू सॅमसन १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

यानंतर रविचंद्रन अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने रियान परागसोबत चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अश्विनने या सामन्यात १९ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. यानंतर ध्रुव जुरेलनेही २० धावांची जलद खेळी केली. त्याने १२ चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले. शिमरॉन हेटमायर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने रियान परागसोबत ४३ धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात हेटमायर १४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी रियान परागच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थानची धावसंख्या १८० च्या पुढे गेली.

रियान परागची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी –

रियान परागने ४५ चेंडूंचा सामना करत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. आतापर्यंतच्या आयपीएलमधील रियान परागची सर्वोच्च खेळी आहे. त्याने शेवटच्या षटकात त्याने एनरिच नॉर्खियाला लक्ष्य केले आणि २५ धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्खिया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.