Rohit Sharma Smashesh Six To Naveen ul Haq Video Viral : लखनऊ सुपर जायंट्सविरोधात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव झाला. लखनऊने या सामन्यात विजय मिळवला पण रोहित शर्माच्या ३७ धावांच्या खेळीनं चाहत्यांचं खूप मनोरंजन झालं. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने २५ चेंडूत ३७ धावा केल्या. या इनिंगमध्ये रोहितने ३ षटकार आणि १ चौकार ठोकला.

रोहितने ज्या अंदाजात फलंदाजी केली, ते पाहून चाहत्यांना आनंद झाला. कारण मागील काही दिवसांपासून रोहित धावांसाठी संघर्ष करत होता. रोहित अर्धशतकी खेळी करू शकला नाही, परंतु नवीन उल हकच्या गोलंदाजीवर त्याने गगनचुंबी षटकार ठोकला आणि कोहलीच्या चाहत्यांनी मैदानात एकच जल्लोष केला. रोहितने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – धवनबरोबर पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी गाठलं ‘शिखर’, धर्मशाला येथील डोंगरावर गब्बरने केली धमाल, कितने आदमी थे? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

आयपीएल २०२३ मध्ये कोहली आणि नवीन उल हक यांच्यात एका सामन्यादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर कोहलीच्या चाहत्यांनी नवीन उल हकला ट्रोल केलं होतं. जेव्हा रोहितने नवीन षटकार ठोकला, त्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीच्या चाहत्यांनी ट्वीटरवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. कोहलीचा बदला घेतला म्हणून काही चाहत्यांनी रोहितचे आभारही मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. रोहितने नवीनच्या गोलंदाजीवर फ्लिक करून एक जबरदस्त षटकार ठोकला. तसंच या सामन्यात टीम डेव्हिडनेही नवीन उल हकच्या गोलंदाजीवर खूप धावा काढल्या. मुंबई इंडियन्सच्या इनिंगमध्ये १९ व्या षटकात नवीन उल हक गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी मुंबईच्या फलंदाजांनी या षटकात १९ धावा कुटल्या.