आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याकडे दिल्यापासून विविध चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्मा पंड्याच्या नेतृत्त्वार नाखूश असल्याने तो मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार असून आयपीएल २०२५ साठीच्या मेगा लिलावात सहभागी होऊ शकतो, अशी चर्चाही मीडियामध्ये रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर लखनौ सुपर जायंट्स संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा एक व्हीडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माला मेगा लिलावात खरेदी करण्याबाबत वक्तव्य केले आहे.

– quiz

पुढच्या वर्षीच्या लिलावात रोहितला संघात घेण्याची शक्यता पाहता, एलएसजीच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्याने मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना प्रश्न विचारला आणि आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात रोहितला साईन करण्याची शक्यताही सुचवली, ज्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज लँगरला प्रश्न खूप मनोरंजक वाटला आणि यावरील त्यांची प्रतिक्रिया आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गेल्या ११वर्षात मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितने मिळवलेले यश आणि त्याची कामगिरी पाहता, त्याला करारबद्ध करण्यासाठी कोणताही संघ अगदी एका पायावर तयार असेल.

व्हायरल व्हिडिओमध्ये, एलएसजीच्या सोशल मीडिया टीममधील एका मुलाखतकाराने लँगरला विचारले – “पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे आणि अनेक खेळाडू यामध्ये असणार आहेत. तुम्हाला जर कोणत्या एका खेळाडूला निवडायचे असेल तर कोणाची निवड कराल? यावर लँगर म्हणाला- जर कोणता एक खेळाडू निवडायचा असेल तर मी कोणाला निवडेन… तुला काय वाटतं?” प्रश्नाच्या उत्तरात, मुलाखतकार रोहित शर्माचे नाव सुचवतो आणि म्हणतो – आपण रोहित शर्माला घेऊ शकतो? हे ऐकल्यानंतर प्रशिक्षकाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

लँगर या प्रश्नावर आश्चर्यचकित झाले आणि हसता हसता म्हणाले – “रोहित शर्मा? आपण त्याला मुंबईकडून आपल्या संघात घेणार आहोत? मला वाटत नाही की असं काही होईल.”

रोहितला आयपीएल २०११ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने संघात दाखल केले आणि तेव्हापासून तो संघाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी २०० आयपीएल सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत त्याने फ्रँचायझीसाठी २०२ आयपीएल सामन्यांमध्ये ५१५९ धावा केल्या आहेत. रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच जेतेपद पटकावली आहेत.