चेन्नई सुपर किंग्सने आठव्या हंगामाची सुरुवात चार सामन्यांत चार विजयांसह केली. मात्र राजस्थान रॉयल्सने त्यांचा विजयरथ रोखला. रॉयल्ससमोर निष्प्रभ ठरलेल्या चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीद्वारे विजयपथावर परतण्याची संधी आहे.
ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स या त्रिकुटावर बंगळुरूची भिस्त आहे. मात्र या तिघांनाही यंदा मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयश आले आहे.  प्रचंड रक्कम खर्च करून ताफ्यात सामील करण्यात आलेल्या दिनेश कार्तिकला एकदाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकात मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा मिचेल स्टार्क भारतात दाखल झाला आहे. दुखापतीमुळे तो बंगळुरूसाठी खेळू शकला नव्हता. स्टार्क अंतिम अकरात आल्यास बंगळुरूची गोलंदाजी भेदक होऊ शकते. डेव्हिड वाइजने अष्टपैलू कामगिरी केली होती. मात्र अबू नेचिम आणि वरुण आरोन यांनी सपशेल निराशा केली होती. युझवेंद्र चहलकडून बंगळुरूला मोठय़ा अपेक्षा आहेत.
चेन्नईसाठी ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ ही धडाकेबाज सलामीची जोडी महत्त्वाची आहे. सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीला सूर गवसल्याने बंगळुरूच्या चिंता वाढल्या आहेत. ड्वेन ब्राव्होमुळे संघाला संतुलितता मिळाली आहे. रवींद्र जडेजा सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरला आहे. आशीष नेहरा, ईश्वर पांडे आणि मोहित शर्मा या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आहे गेलचा झंझावात रोखण्यासाठी अश्विनची फिरकी निर्णायक ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिस्पर्धी संघ :
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), माइक हसी, ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, ब्रेंडन मॅक्क्युलम, एकलव्य त्रिवेदी, कायले अबॉट, बाबा अपराजित, रवीचंद्रन अश्विन, सॅम्युअल बद्री, अंकुश बैन्स, फॅफ डू प्लेसिस, मॅट हेन्री, रवींद्र जडेजा, मिथुन मन्हास, रोनित मोरे, पवन नेगी, आशीष नेहरा, ईश्वर पांडे, इरफान पठाण, प्रत्युश सिंग, सुरेश रैना, मोहित शर्मा, राहुल शर्मा, अँड्रय़ू टाय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डी’व्हिलियर्स, वरुण आरोन, सीन अबॉट, अबू नेचिम, सुब्रमण्यम बद्रीनाथ, शिशिर बावणे, मनविंदर बिस्ला, युझवेंद्र चहल, अशोक दिंडा, इक्बाल अब्दुल्ला, दिनेश कार्तिक, सर्फराझ खान, निक मॅडिसन, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिलने, हर्षल पटेल, रिले रोसू, डॅरेन सॅमी, संदीप वॉरियर, जलाज सक्सेना, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, डेव्हिड वाइज, विजय झोल.
वेळ : रात्री ८ पासून। थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्सवर.

मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal challengers bangalore face acid test against chennai super kings
First published on: 22-04-2015 at 02:01 IST