हैदराबाद सनरायजर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज (मंगळवार) झालेल्या सामन्यात बंगळुरू संघाने सात विकेट्सने विजय मिळवला आहे.  बंगळुरू संघाच्या विराट कोहलीने कर्णधारी खेळी करत हैदराबाद संघावर मात केली. विराट कोहलीने ४३ चेंडूत ९३ धावा ठोकल्या आणि आयपीएलमधील सर्वाधिक धावांसाठीची ऑरेंज कॅप आता कोहलीकडे आली आहे.  बंगळुरू संघातील ज्याची रॉयल फलंदाजी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात अशा कॅरेबियन खेळाडू क्रिस गेलने या सामन्यात त्याच्या चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर भारतीय युवा फलंदाज मयंक अग्रवाल आणि ए.बी.डीवीलर याच्यांत उत्तम भागीदारी  होत असताना, डीवीलर पंधरा धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहलीने संघाचे नेतृत्व सांभाळत विजय मिळवला. 

हैदराबाद सनराजर्सने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्विकारली होती. परंतु, पहिले दोन फलंदाज लवकर बाद झाल्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय निष्फळ ठरतो की काय? अशी परिस्थिती हैदराबाद संघासमोर निर्माण झाली होती. हैदराबादचा कर्णधार कुमारसंगकारा २३ धावांवर बाद झाला. त्यानंतरचेही दोन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतले आणि संघाची धावसंख्या ३ बाद ८३ धावा अशी झाली होती. त्यानंतर तिसारा परेरा आणि कॅमरुन व्हाईटने संघाचा डाव सावरण्यास सुरूवात केली आणि वीसाव्या षटकाअखेरीस हैदराबाद संघाची धावसंख्या ६ बाद १६१ धावांपर्यंत पोहोचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीच्या या दोन संघांत झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हा सामना जिंकण्याच्या निर्धाराने बंगळुरू संघ मैदानात उतरला. सामन्याच्या सुरूवातीला हैदराबाद संघाची धावसंख्या रोखण्यात बंगळुरू संघाच्या गोलंदाजांना  यश आले. त्यानंतर कॅमरुन व्हाईट आणि तिसारा परेराने उत्तम भागीदारी करत संघाला सावरले होते. परंतु सरते शेवटी रॉयल चॅलेंजर्सने सनराजर्सवर विजय मिळवला