भारतात आयपीएलची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांसोबतच संघांचे खेळाडूही या लीगचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल. लीग सुरू होताच तो परदेशी खेळाडूंचा आनंद लुटताना दिसला. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युजवेंद्र चहल आणि जो रूट यांनी आपल्या अप्रतिम डान्सने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

युजवेंद्र चहलचे सर्व खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. तो सर्वांसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. त्याच वेळी, आता चहल राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंचे मनोरंजन करत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला फिरकी मास्टर रूटला स्टेप्स शिकवताना दिसत आहे. यानंतर दोघांनीही अप्रतिम पद्धतीने लयीत ताल मिसळला. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे इंग्लिश फलंदाज हिंदी गाण्यावर नाचत आहेत. ‘कर बैठी सजना भरोसा तेरे प्यार में’ या गाण्यावर दोन्ही खेळाडूंनी स्टेजवर जोरदार डान्स केला. चहलने हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलमध्ये शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘जो रूट आपके आयपीएल में स्वागत है यूजी चहल स्टाइल.’

जो रूट उशिरा सामील झाला

आयपीएलमध्ये सामील होण्यापूर्वीच इंग्लंडच्या स्टार फलंदाजाचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये तो चहलची आठवण काढताना दिसत होता. जो रूट त्याच्या राष्ट्रीय कर्तव्यामुळे उशिरा आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. चहलने त्याचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर शिखर धवन आणि सॅम बिलिंग्स देखील त्याच्या रीलवरील कमेंट्समध्ये एन्जॉय करताना दिसले. शिखर धवनने त्यावर कमेंट करत लिहिले, ‘उजी भाई चुम तो नहीं लिया तूने उसे.’ चहलच्या या रीलला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

सॅमसनचा एक चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सलापंजाब किंग्सकडून ५ धावांनी पराभूत व्हावे लागले. पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा राजस्थानने जोरदार पाठलाग केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सला अखेरीस निसटता पराभव पत्करावा लागला. आता या पराभवासाठी कर्णधार संजू सॅमसनने घेतलेला एक चुकीचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. पंजाब किंग्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने रविचंद्र अश्विनला सलामीसाठी पाठवले.

हेही वाचा: IPL 2023: झूमे जो पठाण… पायाला पट्टी बांधलेली, तरीही विराट कोहलीने शाहरुख खानसोबत लगावले ठुमके, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विन सलामीवीर म्हणून चमक दाखवू शकला नाही, हीच बाब अखेरीस राजस्थानच्या पराभवाचे कारण ठरल्याचे सांगितले जात आहे. कर्णधार शिखर धवन ( ८६ धाव), प्रभसिमरन सिंग (५६धावा) यांनी दिलेल्या तुफानी सुरुवातीच्या जोरावर पंजाबने २० षटकांमध्ये १९७ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर नाथन एलिसच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव अडखळला होता. अखेरीस त्यांना पराभूत व्हावे लागले. युजवेंद्र चहलने आयपीएलची सुरुवात छान केली आहे. पहिल्या सामन्यात त्याने ४ बळी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ १ विकेट मिळवता आली. राजस्थानला गेल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.