Sachin Tendulkar credited the bowlers for KKR’s title : कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. केकेआरच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे विरोधी संघ केवळ ११३ धावा करू शकला. त्यानंतर केकेआरने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. केकेआर चॅम्पियन बनल्यानंतर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांचे कौतुक केले. सचिन तेंडुलकरने केकेआरच्या विजयाचे खरे नायक त्यांच्या गोलंदाजांना म्हटले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना लिहले, “केकेआरने सातत्यपूर्ण कामगिरी करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. त्यांच्या फलंदाजांनी हंगामाची सुरुवात दमदार केली, परंतु स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गोलंदाजांनी आपला प्रभाव दाखवला आणि ते केंद्रस्थानी राहिले. अंतिम फेरीत सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Vikram Rathour on Shubman Gill
Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य
Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’
Sourav Ganguly Reveals About Rohit Sharma's Captaincy
‘आता सगळेच विसरलेत…’, रोहित शर्माला कर्णधार बनवल्याने शिवीगाळ करणाऱ्यांना सौरव गांगुलीचे चोख प्रत्युत्तर
Yuvraj Singh explosive batting 28 balls 59 runs
WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
Rahul Dravid deserves to be honoured with Bharat Ratna
‘या’ माजी खेळाडूला भारतरत्न द्या, टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सुनील गावसकरांची सरकारकडे मागणी
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल
Suryakumar yadav received best fielder medal from Jay shah video
IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO
Rohit Sharma Becomes First Captain to win 50 T20 International Matches
IND vs SA Final: भारताच्या ऐतिहासिक विजयासह रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटमध्ये ही कामगिरी ठरला पहिलाच कर्णधार

केकेआरच्या गोलंदाजांचे कौतुक करताना सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “त्यांनी झटपट विकेट्स घेत हैदराबाद संघाला कमी धावसंख्येवर रोखले, ज्यामुळे केकेआर संघाला धावांचा पाठलाग करणे सोप्पे झाले. त्याचबरोबर आपल्या संघासाठी तिसरी ट्रॉफी जिंकल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आणि कोचिंग स्टाफचे अभिनंदन. तसेच शाहरुख खान आणि गौतम गंभीरचेही अभिनंदन. त्याचबरोबर ज्या संघाने गेल्या २ महिन्यांत आयपीएलमध्ये अनेकदा छाप पाडली, परंतु अंतिम फेरीत विजय मिळवू शकले नाहीत, अशा सनरायझर्स हैदराबाद संघाचेही अभिनंदन.”

हेही वाचा – “…उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते हैं”, KKRला चॅम्पियन बनवल्यानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल

केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, आता एक कुशल रणनीतीकार म्हणून गुरु गंभीरने केकेआरसाठी तिसरी ट्रॉफी जिंकली. कोलकाता नाईट रायडर्स आता चेन्नई सुपर किंग्ज (पाच) आणि मुंबई इंडियन्स (पाच) नंतर तीन आयपीएल विजेतेपद जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे कोलकाताने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारत तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा – IPL 2024 Final : गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

कोलकाताने हैदराबादचा ८ गडी राखून उडवला धुव्वा –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्व १० गडी गमावून ११३ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी खेळली. केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने २.३ षटकात ७.६च्या इकॉनॉमीसह १९ धावा दिल्या आणि ३ बळीही घेतले. त्यांच्याशिवाय हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून ११४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने अर्धशतक (५२) केले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली.