Sunil Gavaskar Statement On Crowd Chanting Kohli Kohli : आयपीएल २०२३ चा ५८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. या सामन्यात लखनऊने सात गडी राखून हैदराबादवर विजय मिळवला. परंतु, शनिवारी राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात धक्कादायक घटना पाहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर मैदानात दिसताच विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याला पुन्हा डिवचलं. ‘कोहली कोहली’चा नारा लावत असतानाच काही प्रेक्षकांनी डगआऊटच्या दिशेनं वस्तू फेकल्या. त्यामुळे अंपायर्सने काही काळ सामना बंद ठेवला होता. या गंभीर प्रकारानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आणि सायमन डूल यांनी प्रेक्षकांना फटकारले.

या प्रकाराबाबत गावसकर प्रतिक्रिया देत म्हणाले, खूप डगआऊट्समध्ये फ्लेक्सी ग्लास आहेत, हे समजणं खूप कठीण आहे. इथे बीच अंब्रेलासारख्या गोष्टी आहेत. ज्या सुरक्षित नाहीत. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मैदानात योग्य पद्धतीचे डगआऊट्स देऊ शकतं. ज्यामुळे अशाप्रकारचा गोंधळ होणार नाही. इथे असलेल्या मेकशिफ्ट मोठी समस्या आहे.” तसंच सायमन डूल याबाबत म्हणाले, चाहत्यांनी त्यांच्या संघासाठी केलेलं कृत्य निराशाजनक आहे. आम्ही या प्रकरणात खोलात जात नाहीत. पण जे काही घडलं ते खूप निराशाजनक आहे.”

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

नक्की वाचा – Video: आरारारा खतरनाक! हैद्राबादविरोधात पूरन-स्टॉयनिसने पाडला षटकारांचा पाऊस, एकाच षटकात ठोकले ६,६,६,६,६

सामना संपल्यानंतर एसआरएचचा विकेटकिपर हेनरिक क्लासेनंही यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, इथले स्थानिक प्रेक्षक चुकीचे वागले. त्यांचं असं वागणं अशोभनीय आहे. घरेलु मैदानात तुम्ही अशाप्रकारचं कृत्य करू शकत नाहीत. या प्रकारामुळं सामन्यात गोंधळ उडाला आणि खेळाडूंची एकाग्रता कमी झाली. सामन्यात अंपायर्सचे काही निर्णय चुकीचे झाले असतील, पण तो खेळाचा भाग आहे आणि तुम्हाला त्यासोबत पुढं जावं लागतं.”