Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Kings Score Updates : आयपीएल २०२३ चा ५८ वा सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होत आहे. हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एसआरएचच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तार माघारी परतला. त्यानंतर अनमोल प्रीतने ३६ धावांची खेळी साकारून हैद्राबादच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. राहुल त्रिपाठीने २० तर कर्णधार एडन मार्करमने २८ धावांची खेळी केली. त्यानंतर हेन्री क्लासेन आणि अब्दुल समदने जबरदस्त भागिदारी करून हैद्राबादची धावसंख्या वाढवली. त्यामुळे २० षटकांत हैद्राबादने सहा विकेट्स गमावत १८२ धावा केल्या. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी १८३ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2023 रोजी प्रकाशित
IPL 2023, SRH vs LSG : क्लासेन-समदने दाखवला फलंदाजीचा ‘क्लास’, लखनऊला विजयासाठी १८३ धावांचं लक्ष्य
IPL 2023 SRH vs LSG Cricket Score Updates : सनरायझर्स हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Written by स्पोर्ट्स न्यूज डेस्क

First published on: 13-05-2023 at 17:22 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad scored 182 runs in 20 overs lucknow super gaints needs 183 runs to win srh vs lsg ipl 2023 nss