Nicholas Pooran dance after win against KKR: इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या ६८व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा अवघ्या एका धावांनी पराभव केला आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. केकेआरविरुद्धच्या या विजयानंतर लखनऊविरुद्धच्या सेलिब्रेशनमध्ये पूर्णपणे मग्न झाले. लखनऊला हा विजय खूप अवघड असला तरी विजय हा विजय असतो. त्यामुळेच संघाचा स्टार फलंदाज आणि सामनावीर ठरलेल्या निकोलस पूरनने या विजयाच्या सेलिब्रेशनचा मनमोकळा आनंद लुटला.

निकोलस पूरनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या विजयानंतर पूर्ण उत्सवाच्या मूडमध्ये दिसत आहे. पूरणने आपला टी-शर्ट काढून विजयाचा जल्लोष साजरा केला. या व्हिडिओमध्ये पूरनने पंजाबी गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. पूरन जिम सेशनमध्ये होता आणि वर्कआउट करत होता. यादरम्यान प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीचे ‘बोलो तारा रा रा’ हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजले तेव्हा पूरनलाही भांगडा करण्यापासून स्वतः ला रोखता आले नाही.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती

लखनऊ सुपर जायंट्सने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये पूरन सलमान खानसारखा शर्ट काढून डान्स करताना दिसत आहे. यामध्ये पूरनसोबत लखनऊ सुपर जायंट्सचे अन्य खेळाडू आहेत. हे सर्वजण दलेर मेहंदीच्या लोकप्रिय पंजाबी गाण्यावर नाचत आहेत, ‘बोलो तारारा रारा… हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून पूरनच्या या डान्स स्टेपचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

लखनऊचा कोलकातावर निसटता विजय

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात १७६ धावा केल्या. लखनऊकडून या डावात निकोलस पूरनने दमदार खेळ केला आणि त्याने अर्धशतकी खेळी खेळली. या डावात त्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. पूरनच्या खेळीमुळे लखनऊ संघाला केकेआरसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. मात्र, लखनऊच्या गोलंदाजांना लक्ष्याचा बचाव करणे कठीण गेले. रिंकू सिंगच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर केकेआरने सामना जवळपास जिंकला, पण शेवटच्या षटकात यजमानांची अवघ्या एका धावेने विजयाची संधी हुकली.

हेही वाचा: IPL2023: आरसीबी प्ले ऑफमधून बाहेर पडताच सोशल मीडियावर ट्रोलधाड झाली अ‍ॅक्टिव्ह, पराभवानंतर शुबमन गिलच्या बहिणीला वापरले अपशब्द

आयपीएल २०२३च्या लिलावा आधी सनरायझर्स हैदराबादने पूरनला रिलीज केले होते. त्यानंतर लखनऊने त्याला तब्बल १६ कोटींची मोठी रक्कम देत आपल्या संघात सामील करून घेतले. त्यावेळी अनेकांनी या निर्णयावर टीका केलेली. मात्र, गंभीरने या निर्णयाची पाठराखण करताना, “तो एक शानदार खेळाडू असून अनेकांनी त्याचा योग्य वापर केला नाही”, असे वक्तव्य केले होते. तसेच, तो लखनऊ संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केलेली. गंभीर्याचा हाच विश्वास त्याने आता योग्य ठरवला.