Suyash Sharma Dropped Catch Video Viral: शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघात आयपीएल २०२३ मधील ३९वा सामना खेळला गेला. या सामन्यात जीटीच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकांत वादळी खेळी करताना केकेआरच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. एक वेळ अशी आली होती की, गुजरातला विजयासाठी ३७ चेंडूत ७३ धावा करायच्या होत्या. पण १४व्या षटकानंतर खेळ असा बदलला की सगळे पाहतच राहिले.
विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी मिळून झटपट धावा केल्या आणि १८ व्या षटकातच जीटीला विजय मिळवून दिला. या सामन्यात मिलरने आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. त्याचा झेल सुयश शर्माने सोडला, त्यानंतर आंद्रे रसेल रागाने लाल झाला होता. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हे दृश्य १६व्या षटकात पाहायला मिळाले –
हे दृश्य १६व्या षटकात पाहायला मिळाले. आंद्रे रसेलने पहिला चेंडू डेव्हिड मिलरला टाकला, तेव्हा मिलरने त्यावर मोठा फटका मारायचा प्रयत्न केला, पण चेंडू दूर न जाता हवेत उंच गेला. हा चेंडू झेलण्यासाठी खाली आलेल्या सुयशला अंदाज आला नाही आणि तो झेल सुटला. सुयशच्या हातून झेल सुटलेला पाहून रसेलला इतका राग आला की तो चिडला. त्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणा हा झेल सुटल्यानंतर तोंडावर हात ठेवून गुडघ्यावर बसला.
शंकर आणि मिलरने धावांचा पाऊस पाडला –
हा झेल सोडल्यानंतर शंकर आणि मिलरने झटपट धावा केल्या. शंकरने २४ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या, तर मिलरने १८ चेंडूंत ३२ धावा करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. अशाप्रकारे, जीटीने ३७ चेंडूत ७३ धावा हव्या असणारा सामना फिरवला. तसेच संघाला अवघ्या 24 चेंडूत सामना जिंकून दिली. जीटीने ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर केकेआरचा संघ ९ पैकी ६ सामने गमावून सातव्या स्थानावर आला आहे.