Virat Kohli Angry After Listening RCB Song in Stadium: एका आठवड्याच्या स्थगितीनंतर आयपीएल २०२५ ला पुन्हा सुरूवात होत आहे. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ त्यांच्या घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. पावसामुळे हा सामना सुरू होण्यासाठी वेळ लागला आहे. याचबरोबर, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. पण या सामन्यापूर्वी विराट कोहली मैदानावर वैतागला होता.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा पाठोपाठ विराटच्या निवृत्तीने सर्वांनाच धक्का दिला. या निवृत्तीनंतर विराट पहिल्यांदाच आज मैदानावर उतरणार आहे. पावसामुळे हा सामना उशिरा सुरू होणार आहे. पावसाने विश्रांती घेतली असून सामन्याबाबत अपडेटकडे सर्वांचं लक्ष आहे.
स्टेडियममध्ये अचानक आरसीबीच्या संघाचे गाणं सुरू झालं आणि विराट कोहली सराव करत होता. हे गाणं ऐकताच त्याला राग आला, त्याने ते गाणं लगेच बंद करण्यासाठी सांगितले, असा खुलासा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पण मैदानावर नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली चर्चेचा विषय ठरला आहे. केकेआरविरूद्धचा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा असणार आहे. जर आरसीबीने केकेआरविरूद्धचा सामना जिंकल्यास प्लेऑफमधील आपलं तिकिट पक्क करणार आहे. त्यामुळे विराट कोहली नेट्समध्ये जोरदार सराव करत होता. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, कोहली नेटमध्ये सराव करत असताना ही घटना घडली.
चिन्नास्वामी स्टेडियमच्या साउंड सिस्टीमवर आरसीबी संघाचं गाणं खूप मोठ्या आवाजात वाजवले जात होते. तर कोहलीने त्याचा सराव करत होता. पण या गाण्यामुळे तो सरावावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याने तो वैतागला. त्यामुळे गाणं ऐकून कोहली रागावला आणि त्याने ते गाणं थांबवण्यास सांगितलं. विराट कोहलीच्या सांगण्यावरून स्पीकर्स लगेच बंद करण्यात आले. यानंतर त्याने फलंदाजीचा सराव पुन्हा सराव केला. त्याने काही स्ट्रेट ड्राईव्ह मारले. त्याच्या बॅटमधून काही पुल शॉट्सही पाहायला मिळाले.
आरसीबीचा आजचा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर संघाला गुणतालिकेत टॉप-२ मध्ये राहण्याची संधी गमावतील. विराट कोहली यंदाच्या मोसमात अप्रतिम फॉर्मात आहे. कोहलीने आक्रमक फलंदाजी करत ११ सामन्यांमध्ये ६३ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४३ होता. त्याच्या बॅटमधून ७ अर्धशतकं पाहायला मिळाली. तर कोहलीने १८ षटकार आणि ४४ चौकार मारले आहेत.