विराट कोहलीने आरसीबीच्या अनबॉक्स कार्यक्रमात त्याला ‘किंग’ म्हणू नका अशी आपल्या चाहत्यांना विनंती केली. कोहलीचे चाहते त्याला ‘किंग कोहली’ म्हणतात, पण या स्टार फलंदाजाला हे नाव विचित्र वाटते. आरसीबी अनबॉक्स कार्यक्रमादरम्यान कोहलीने त्याच्या चाहत्यांना खास आवाहन केले. त्याने कार्यक्रमाचे सूत्रधार दानिश सैत आणि चाहत्यांना त्याला किंग म्हणू नका, मला यामुळे खूपच विचित्र वाटतं असे सांगितले.

– quiz

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

१९ मार्चला बंगळुरू संघाचा चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी अनबॉक्स नावाचा मोठा सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात संघाने आपले नाव बदलून Royal Challengers Bengaluru असे केले. तर आयपीएल २०२४ साठीच्या नव्या जर्सीचे अनावरण केले. पण तत्पूर्वी महिला प्रीमियर लीग २०२४ चा महिला विजेता आरसीबी संघाचे स्वागत केले. यानंतर विराटने चाहत्यांशी संवाद साधला.

विराटने चाहत्यांशी संवाद साधायला माईक घेतला आणि एकच विराटच्या नावाचा आवाज दुमदुमला. यादरम्यान बोलताना विराटने सर्वांना विनंती करत सांगितले की,मला किंग म्हणू नका. विराट म्हणाला, “सर्वप्रथम तर तुम्ही मला त्या नावाने (किंग) हाक मारणं थांबवा. कृपया मला विराट म्हणा. पण त्या नावाने (किंग) हाक मारू नका. मी आताच फाफ डु प्लेसिससोबत बोलत होतो की तुम्ही जेव्हा जेव्हा या नावाचा माझ्यासाठी उल्लेख करता तेव्हा मला खूप विचित्र वाटतं. आता यापुढे मला विराटचं म्हणा. पु्न्हा ते नाव (किंग) नको. ते ऐकल्यावर खूप ओशाळल्यासारखं वाटतं.”

आरसीबीचा संघ आयपीएल २०२४ च्या पहिल्याच सामन्यातून आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जविरूध्दच्या पहिल्या सामन्यासाठी आरसीबीचा संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे.२२ मार्चला त्यांचा पहिला सामना धोनीच्या चेन्नई संघासोबत रात्री ८ वाजता असणार आहे.