Virat Kohli Dance Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. फलंदाजी करत असताना त्याची धावा करण्याची भूक दिसून येते. तर क्षेत्ररक्षण करत असताना त्याची एनर्जी दिसून येते. झेल पकडल्यानंतर, विकेट गेल्यानंतर तो अनेकदा आक्रमक सेलिब्रेशन करतो. यासह अनेकदा मैदानात डान्स करताना देखील दिसून आला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असताना भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा दमदार विजय

आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. पंजाबचे ४ प्रमुख फलंदाज पावरप्लेच्या षटकात माघारी परतले. पंजाबचा संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही. संपूर्ण संघ १५ व्या षटकात १०१ धावांवर गारद झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अवघ्या १०२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्टने दमदार सुरूवात करून दिली. विराट कोहलीने लागोपाठ २ चौकार मारत १२ धावा केल्या. तर फिल सॉल्टने नाबाद ५६ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला.

विराट कोहलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो डान्स करताना दिसून येत आहे. विराट रविना टंडन आणि गोविंदाच्या, “अंखियों से गोली मारे..”, या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील आहे. हा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.