IPL Code of Conduct Rule 2.21 : आयपीएल २०२३ चा ४३ वा सामना १ मे रोजी एलएसजी आणि आरसीबी संघात खेळला गेला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात आरसीबीने यजमानांचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान बंगळुरूचा विराट कोहली आणि लखनऊचे नवीन-उल-हक, अमित मिश्रा, काईल मेयर्स आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली.

या वादावादीनंतर बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीरवर १०० टक्के मॅच फीचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर नवीन-उल-हकला ५० टक्के मॅच फीचा दंड आकारला. आयपीएल आचारसंहितेच्या कोणत्या नियमानुसार विराट आणि गंभीर यांना दंड ठोठावण्यात आला आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

गंभीर-कोहलीने नियम २.२१ चे उल्लंघन केले –

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमधील सामन्यादरम्यान खेळाडूंच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आचारसंहिता बनवली आहे. ज्याला आयपीएल आचारसंहिता (आयपीएल कोड ऑफ कंडक्ट) म्हणतात. सामन्यादरम्यान खराब वर्तन केल्याबद्दल, या आचारसंहितेत समाविष्ट असलेल्या नियमांनुसार खेळाडूंना शिक्षा केली जाते. लखनऊ आणि बंगळुरू सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांना आयपीएल आचारसंहितेच्या नियम २.२१ अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा – Naveen ul Haq: कोण आहे ‘नवीन’? ज्याच्यामुळे कोहली आणि गंभीर पुन्हा एकदा भिडले, जाणून घ्या

काय आहे २.२१ आचारसंहिता नियम?

आयपीएल आचारसंहिता २.२१ मध्ये त्या सर्व गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे खेळाची बदनामी होते. यामध्ये जाणूनबुजून केलेले गुन्हे, खेळाला प्रतिकूल अशा अयोग्य टिप्पण्या आणि सार्वजनिक गैरवर्तन यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएल आचारसंहिता २.२१ च्या उल्लंघनासाठी दोषी आढळले आहेत.

हेही वाचा – RCB vs LSG: लखनऊच्या खेळाडूंशी झालेल्या वादानंतर विराट कोहलीची ‘ती’ इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल, जाणून घ्या काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणाला किती दंड ठोठावला?

विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्यातील जोरदार वादाची दखल घेत बीसीसीआयने दोघांना दंड ठोठावला आहे. बोर्डाने विराट कोहलीला १०० टक्के मॅच फी म्हणजेच १.०७ कोटी रुपये, गौतम गंभीरला १०० टक्के मॅच फी म्हणजेच २५ लाख रुपये आणि नवीन-उल-हकला ५० टक्के मॅच फी म्हणजेच १.७९ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या तिघांनीही आयपीएल आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार नाही.